ठामपावर तीन हजार कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:43 AM2020-02-29T00:43:28+5:302020-02-29T00:43:34+5:30

ठाणे : गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेचे उत्पन्न हे १३०० कोटींवरून थेट २५०० कोटींवर गेले आहे. मात्र, ते वाढत ...

Loan of Rs. 3,000 crore on stamp duty | ठामपावर तीन हजार कोटींचे कर्ज

ठामपावर तीन हजार कोटींचे कर्ज

Next

ठाणे : गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेचे उत्पन्न हे १३०० कोटींवरून थेट २५०० कोटींवर गेले आहे. मात्र, ते वाढत असताना महापालिकेने ठाण्यात अनेक मोठे प्रकल्पही हाती घेतले आहेत. त्यातून ठाणेकरांना किती फायदा होईल, हे सांगणे कठीण असले, तरी यामुळे महापालिकेला तीन हजार कोटींपेक्षा अधिकची देणी द्यावी लागणार आहेत. यातून बाहेर पडण्यापेक्षा महापालिकेच्या माध्यमातून आगामी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर करवाढीची कुºहाड टाकण्याचा निर्णय प्रशासनाने प्रस्तावित केला आहे. आपल्या चुकीच्या निर्णयांचे बिल प्रशासन ठाणेकरांच्या खिशातून कापणार आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक मोठ्या प्रकल्पांची आखणी प्रशासनाने केली आहे. त्यावर होणाऱ्या खर्चाचा डोंगर वाढला असून टप्प्याटप्प्यांनी तो कमी करण्याचे मोठे आव्हान आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत ठाणे महापालिकेचे उत्पन्नदेखील १३०० कोटींवरून २५०० कोटींवर गेले आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आयुक्तपदाचा पदभार सांभाळण्याच्या पूर्वी कामगारांचे पगार होतील की नाही, अशी ठाणे महापालिकेची परिस्थिती होती. आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी वसुलीवर भर दिला होता. 

Web Title: Loan of Rs. 3,000 crore on stamp duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.