Video: ट्रान्स हार्बरवर लोकलचे डबे घसरले; ठाणे-वाशी, पनवेल लोकलसेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 20:59 IST2019-08-11T19:43:27+5:302019-08-11T20:59:22+5:30
आज रविवारचा दिवस असल्याने कार्य़ालयांना सुटी असते.

Video: ट्रान्स हार्बरवर लोकलचे डबे घसरले; ठाणे-वाशी, पनवेल लोकलसेवा ठप्प
ठाणे : ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर गणपती पाड़ा येथे लोकलचे दोन डबे घसरल्याने लोकल सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे.
वाशी पनवेल सेवा पूर्णपणे ठप्प; ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर गणपती पाड़ा येथे लोकलचे दोन डबे घसरले https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2019
सायंकाळी ६.३० ते ७ दरम्यान हा अपघात झाला. आज रविवारचा दिवस असल्याने कार्य़ालयांना सुटी असते. यामुळे लोकलमध्ये कमी प्रवासी होते. यामुळे दुर्घटना टळली आहे. घरी जाणाऱ्या तसेच रात्रपाळीसाठी कंपनीत जाणाऱ्या लोकांची गर्दी अचानकपणे ठाण्याच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या सिडको बस स्टॉपवर वाढली आहे. कळव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली आहे. छोट्या वाहनांमुळे ट्राफिक जाम झाले आहे.
ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे ऐरोलीनजीक घसरले आहेत. कोणताही प्रवाशई जखमी नाही. ठाणे-वाशी, पनवेल लोकलसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. डबे रुळावर आणण्याचे काम सुरु आहे.
सुनिल उदासी, प्रवक्ता