अंबरनाथमध्ये लोकल रुळावरून घसरली; कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प

By पंकज पाटील | Published: June 18, 2023 10:06 AM2023-06-18T10:06:57+5:302023-06-18T10:07:44+5:30

सुदैवाने या लोकलमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.

local derailment in ambernath railway traffic in karjat direction stopped | अंबरनाथमध्ये लोकल रुळावरून घसरली; कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प

अंबरनाथमध्ये लोकल रुळावरून घसरली; कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प

googlenewsNext

पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथमध्ये आज सकाळी 8.20 वाजता साईडिंगला ठेवण्यात आलेली लोकल फलट क्रमांक दोनवर येत असताना ती रेल्वे रुळावरून घसरल्याने कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या लोकलमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.

आज सकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकालागतच असलेल्या स्लाइडिंग मधील लोकल मुंबई दिशेकडे नेण्यासाठी अंबरनाथच्या फलाट क्रमांक दोनवर आणण्यात येत होती. ही लोकल आठ वाजून 27 मिनिटांनी अंबरनाथ वरून मुंबईच्या दिशेने सुटणार होती. रूळ क्रॉसिंगमध्ये अर्ध्यापर्यंत लोकल गेल्यानंतर ती लोकल रुळावरून घसरल्याने त्या लोकलला त्याच ठिकाणी थांबवावी लागली. 

रेल्वे प्रशासनाने लागलीच अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेकडील रेल्वे सेवा थांबवली होती. त्यानंतर या लोकल घसरण्याच्या घटने डाऊन दिशेकडेल रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. तर अप दिशेकडे रेल्वे मार्ग खुला असला तरी त्या मार्गावरून अद्याप गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. अंबरनाथमध्ये लोकल घसरल्याची घटना घडल्यानंतर मुंबई ते कल्याण अशी लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली असून कल्याणच्या पुढे एकही लोकल गाड्या सोडण्यात येत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज रविवार असल्यामुळे साखर मळ्यांची गर्दी स्थानकात कमी होती. तर दुसरीकडे  ज्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी परिवहन सेवेने बस सेवा सुरू केली आहे. 

Web Title: local derailment in ambernath railway traffic in karjat direction stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.