ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:36 AM2019-07-14T00:36:56+5:302019-07-14T00:37:03+5:30
केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला
नारायण जाधव
ठाणे : केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला असून यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये आले आहेत.
या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करता येणार आहेत. त्यात्या शहरांची लोकसंख्या,भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे हे अनुदान वितरीत होते. या १४ स्वराज्य संस्थांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ड वर्ग महापालिकांसह नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.
>ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी या तीन महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगर परिषद आणि मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, पालघर नगर परिषदांसह विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा या नगरपंचायतींना हे १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये अनुदान मिळणार आहे.
>शासनाने असे केले अनुदानाचे वाटप
स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव अनुदानाची रक्कम
उल्हासनगर महापालिका ३१ कोटी ९८ लाख ११ हजार ९६९
भिवंडी महापालिका ४५ कोटी ५९ हजार ७६३
मीरा-भार्इंदर महापालिका ५२ कोटी २९ लाख ९६ हजार ३५०
बदलापूर नगर परिषद ११ कोटी ६३ लाख ११ हजार ४५८
अंबरनाथ नगर परिषद १६ कोटी ६३ लाख ७३ हजार ३९६
शहापूर नगरपंचायत ८४ लाख ९८ हजार ५२२
मुरबाड नगरपंचायत एक कोटी ५० लाख ८२ हजार २१३
जव्हार नगर परिषद ८२ लाख ४० हजार २७३
डहाणू नगर परिषद तीन कोटी ५१ लाख पाच हजार ३९३
पालघर नगर परिषद पाच कोटी ५८ लाख सात हजार १०१
विक्रमगड नगरपंचायत ७५ लाख ९० हजार ६६
तलासरी नगरपंचायत एक कोटी ५७ लाख ८३ हजार ६२
वाडा नगरपंचायत एक कोटी २६ लाख ३७ हजार ५७२
मोखाडा नगरपंचायत एक कोटी सात लाख ७८ हजार ३२
एकूण १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७०