बाहेरून मुर्ती आणून विकणाऱ्यांना मीरा-भाईंदरमधील स्थानिक मूर्तिकारांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 03:40 PM2021-06-07T15:40:00+5:302021-06-07T15:40:20+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये गणेशोत्सव काळात बाहेरून मुर्ती आणून कुठेही मंडप उभारून विक्री करणाऱ्यां मुळे  स्थानिक मूर्तिकारांवर उपासमारीची पाळी आल्याचा ...

Local sculptors in Mira Bhayandar oppose those who sell idols from outside | बाहेरून मुर्ती आणून विकणाऱ्यांना मीरा-भाईंदरमधील स्थानिक मूर्तिकारांचा विरोध 

बाहेरून मुर्ती आणून विकणाऱ्यांना मीरा-भाईंदरमधील स्थानिक मूर्तिकारांचा विरोध 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये गणेशोत्सव काळात बाहेरून मुर्ती आणून कुठेही मंडप उभारून विक्री करणाऱ्यां मुळे  स्थानिक मूर्तिकारांवर उपासमारीची पाळी आल्याचा आरोप करत मीरा भाईंदर मूर्तिकार प्रतिष्ठानने विरोध दर्शवला  आहे . 

मीरा भाईंदर मध्ये पूर्वी पासून स्थानिक मूर्तिकार हे उत्सव काळात गणपती आणि देवीच्या मुर्त्या बनवत आले आहेत . काही तर आपल्या पूर्वजांचा वा कुटुंबाचा मूर्ती घडवण्याचा वारसा पुढे चालवत आहेत . ह्या स्थानिक मूर्तिकारांनी संघटित होऊन मूर्तिकार प्रतिष्ठान हि संघटना कार्यान्वित केली आहे . 

सदर  संघटनेच्या वतीने मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्या व सूचना मांडण्यात आल्या आहेत .  मूर्तिकार प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पालिका विरोधी पक्ष नेता प्रवीण मोरेश्वर पाटील, शिवकुमार पाटील, सुरेश ज्ञानवलेकर, हेमप्रकाश पाटील, अध्यक्ष सचिन पाटील, सचिव निखिल तावड़े, कोषाध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष उदय पाटील, कार्याध्यक्ष परमानंद ठाकुर, भालचंद्र म्हात्रे, उद्धव भोईर, योगेश लाड आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली . 

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव येत असून मीरा भाईंदर मध्ये स्थानिक मूर्तिकार आपली कला आणि व्यवसाय जोपासत गणेशोत्सव , नवरात्री साठी मुर्त्या साकारत असतात . परंतु मूर्तिकार नसणारे अनेकजण बहरून मुर्त्या विकत आणून वाट्टेल तिकडे अनधिकृत मंडप उभारून व्यवसाय करतात . काहीजण तर जुन्या , खंडित मुर्त्या रंगवून विकतात . तर काहीजण सण संपल्यावर शिल्लक मुर्त्या मंडपात तश्याच सोडून निघून जातात जेणे करून मुर्त्यांची विटंबना आणि  धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण होतो असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले . 

यापुढे शहर बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्ती विक्रेत्यांना मूर्तिकार प्रतिनिष्ठानच्या पत्रा शिवाय परवनगी देऊ नये . अनधिकृत मंडप उभारणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली जावी. शहरात गणेशोत्सव  व मूर्ती बनवणारे यांच्यासाठी  नियमावली बनवण्यात यावी . लॉकडाऊन काळात मूर्तिकारांना ओळखपत्रे द्यावीत. सार्वजनिक उत्सव बाबतच्या पोलीस - पालिका आदींच्या बैठकीसाठी मूर्तिकार प्रतिष्ठानला सहभागी करून घ्यावे आदी  मागण्यांचे निवेदन देण्यात आले . आयुक्तांनी सुद्धा त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिल्याचे निखिल तावडे म्हणाले .  

Web Title: Local sculptors in Mira Bhayandar oppose those who sell idols from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.