लोकलमधून फेकलेल्या बाटलीने गँगमन जखमी, कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:35 AM2018-02-14T02:35:24+5:302018-02-14T02:36:15+5:30

धावत्या लोकलमधून भिरकावलेली काचेची बाटली डोक्यात लागून रेल्वे गँगमनच्या डोक्याला जखम झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. दिलीपकुमार शर्मा (३९, रा. दिवा) असे या गँगमनचे नाव असून त्याला उपचारार्थ कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Locals injured in a balloon thrown by locals, Kalwa-Mumbra railway stations | लोकलमधून फेकलेल्या बाटलीने गँगमन जखमी, कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रकार

लोकलमधून फेकलेल्या बाटलीने गँगमन जखमी, कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रकार

Next

ठाणे : धावत्या लोकलमधून भिरकावलेली काचेची बाटली डोक्यात लागून रेल्वे गँगमनच्या डोक्याला जखम झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. दिलीपकुमार शर्मा (३९, रा. दिवा) असे या गँगमनचे नाव असून त्याला उपचारार्थ कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेचा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने निषेध व्यक्त करीत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान गॅँगमन शर्मा हे इतर १०-१५ सहकाºयांसह रेल्वे रुळालगत काम करीत होते. दुपारी १२.३०च्या सुमारास सीएसटीकडे चाललेल्या धिम्या लोकलच्या एका डब्यातून कोणीतरी भिरकावलेली काचेची बाटली शर्मा यांच्या डोक्याला लागली. त्यामुळे शर्मा यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने ठाणे रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. धावत्या लोकलमध्ये दारू पिऊन नशेत बाटली फेकली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच ठाण्यात रु जू
जखमी झालेले शर्मा हे दोन महिन्यांपूर्वी बदली होऊन ठाण्यात रुजू झाले होते. त्यापूर्वी ते इगतपुरी येथे गँगमनचे काम करीत होते. धावत्या रेल्वेतून नेमकी कुणी बाटली फेकली ते शोधून काढणे आव्हानात्मक असून बाटली फेकणाºयाने ती हेतूत: गँगमनच्या दिशेने भिरकावली किंवा कसे हे शोधून काढणे अधिकच कठीण आहे.

रेल्वे रुळावर काम करताना गँगमनवर थुंकणे, त्यांना लाथ मारणे असे विकृत प्रकार सुरूच आहेत. पण आजच्या घटनेत, थेट बाटली फेकल्याने गँगमन जखमी झाला आहे. हा प्रकार गंभीर आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करीत बाटली फेकणाºयाचा तत्काळ शोध घेऊन त्यास अटक करावी.
- एस. बी. महीधर, कार्याध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

Web Title: Locals injured in a balloon thrown by locals, Kalwa-Mumbra railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे