उल्हासनगरात वाढत्या कोरोना रूग्णामुळे लाॅकडाऊन; व्यापारी संघटनेस राजकीय नेत्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 06:20 PM2020-07-17T18:20:42+5:302020-07-17T18:25:39+5:30
उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली.
उल्हासनगर : साथरोग तंज्ञाचा सल्लाने नव्हेतर, कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. सततच्या लॉकडाऊनला व्यापारी संघटनेसह राजकीय नेते विरोध करीत असून लोकडाऊन दरम्यान महापालिकेने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न विचारला जात आहे.
उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली. सततच्या लॉक डाऊनमुळे व्यापारी, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी रुग्णाची संख्या वाढल्याची टीका महापालिका आयुक्तावर होत आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलै दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कोणालाही विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी व्यापारी संघटनेने एक आठवडा लॉकडाऊन करा. असे पत्र आयुक्तांना दिले होते. तर इतर पक्षांच्या नेत्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली. मात्र भाजपने लॉकडाऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय नव्हे, असे ठणकावून सांगितले होते. लॉक डाऊन च्या १० दिवसात कोरोना रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी तब्बल २ हजार रुग्ण वाढले.
महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन दरम्यान काहीएक उपाययोजना केली नाही. असा आरोप सर्वस्तरातून होत असताना, आयुक्तांनी साथरोग तंज्ञाचा सल्ला विचारात न घेता १२ ते २२ जुलै दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय कसा? असा प्रश्न व्यापारी संघटना, भाजप, मनसे, रीपाइ यांच्यासह कामगार, नागरिक करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येला लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नसुन लॉकडाऊन मुळे व्यापारी, कामगार, नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊन विरोध असल्याचे निवेदन पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी दिली.
व्यापारी केंद्र असलेल्या शहरात सततच्या लाॅकडाऊन मुळे व्यवसायावर अवकळा आली असून व्यापाऱ्यास ह नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन कोरोना संख्येवर उपाययोजना होऊ शकत नाही. आयुक्तांनी कोरो नाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती
शहरात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यापारी संघटनेने स्वतःहून महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र नंतर कोणालाही विश्वासात न घेता आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान आयुक्तांनी काय उपाययोजना केल्या, रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी वाढली कशी?. याबाबत माहिती दिली नाही. व्यापारी संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन लॉकडाऊन उठविण्याची मागणी केली.- सुमित चक्रवर्ती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष