Lockdown Effecet: कपडे खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; यंदा व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:52 PM2020-10-11T23:52:52+5:302020-10-11T23:53:07+5:30

कुलदीप घायवट कल्याण : नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकरानंतर आता कोरोनाने व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत. सहा महिन्यांत कपडा बाजार ठप्प ...

Lockdown Effecet: Consumers turn their backs on buying clothes; Business down 50 per cent this year | Lockdown Effecet: कपडे खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; यंदा व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी

Lockdown Effecet: कपडे खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; यंदा व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी

googlenewsNext

कुलदीप घायवट

कल्याण : नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकरानंतर आता कोरोनाने व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत. सहा महिन्यांत कपडा बाजार ठप्प झाला असून हळूहळू दुकाने उघडण्यास सुरु वात झाली आहे. ग्राहक खरेदीसाठी दुकानात येत आहेत; मात्र पैशांची बचत, मोजकेच साहित्य खरेदी करत आहेत.

वाहतूक सुविधा, हॉटेल आणि रेस्टॉरंट, इतर दुकाने सुरू होत आहेत. यामध्ये कपड्यांची दुकानेही खुली झाली आहेत. मात्र, ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांकडून किमतीत ३० ते ५० टक्के सूट, आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक काही प्रमाणात दुकानात खरेदी करत आहे. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.

गणपती, ईद, रक्षाबंधन यामध्ये ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. साध्या पद्धतीने लग्न समारंभ होत आहेत. त्यामुळे वधू आणि वरासाठीच कपडे खरेदी करण्यात येत होते. परिणामी, ज्याप्रमाणे व्यवसाय होणे अपेक्षित आहे, तसा व्यवसाय होत नाही. कपडे तयार करणाºया कंपन्याही मोजक्याच प्रमाणात कपडे तयार करत आहेत.

नवरात्रीमध्ये काही प्रमाणात ग्राहक येत आहेत. नवरात्री, दसरा या सणांपेक्षा दिवाळीत व्यवसाय चांगला होईल, या आशेवर सर्व व्यापारी आहेत. सणानिमित्त बाजारात नवीन स्टाइलचे कपडे येत आहेत. - कमल आहुजा, कपडे व्यापारी
 

Web Title: Lockdown Effecet: Consumers turn their backs on buying clothes; Business down 50 per cent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.