उल्हासनगरातील हॉटस्पॉट क्षैत्रात ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन कायम, आयुक्तांच्या कामाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:38 PM2020-09-02T16:38:06+5:302020-09-02T16:38:16+5:30
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या विभागात ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजे पर्यंत लॉकडाऊन पुन्हा एकदा घोषीत केला.
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील हॉटस्पॉट असलेल्या परिसरात लॉकडाऊन कायम असल्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी काढला. तसेच दुकानदारांनी सोशल डीस्टंन्सचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई चे संकेत दिले आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या विभागात ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजे पर्यंत लॉकडाऊन पुन्हा एकदा घोषीत केला. हॉटस्पॉट व्यतिरिक्त इतर विभागात भाजी मार्केटसह दुकानें सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आली. सोशल डिस्टंन्सचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्यासह दुकानदारावर प्रथम २ हजार, दुसरी वेळा ५ हजार तर तिसरी वेळा उल्लंघन केल्यास दुकानें कायम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना प्रथम ५००, दुसरी वेळा एक हजार तर तिसरी वेळा थेट गुन्हे दाखल करण्याचे संकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशात दिले आहे.
शहारा शेजारील शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना, शहर कोरोना मुक्त ठेवणाऱ्या तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली झाल्यानंतर, आयुक्त पदी आलेले समीर उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र जेमतेम एक महिन्याच्या आयुक्त पदाच्या कालावधीत कोरोना रुग्णांचा स्पोट झाला. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्य शासनाने आय ए एस दर्जाचे डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती महापालिकेच्या आयुक्त पदी केली.