ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:53 AM2020-07-18T00:53:34+5:302020-07-18T00:54:46+5:30

अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला.

Lockdown of Kalyan, Dombivali increased due to Thane | ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीत लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन केले नसते तर कदाचित जास्त रुग्णसंख्या असती. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढवायचे की नाही, याबाबत केडीएमसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वसामान्यांकडून लॉकडाऊनला तीव्र विरोध होत आहे.
अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्याने रुग्णसंख्या ४५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्राधान्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची पहिली घोषणा ठाणे महापालिकेने केली होती. लॉकडाऊनची मुदतही ठामपाने वाढवली. केडीएमसीने त्याचे अनुकरण केले. त्यामुळे ठामपा आता काय निर्णय घेते, याकडे केडीएमसी लक्ष ठेवून आहे.

लॉकडाऊनची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. २० जुलैपासून रिक्षाचालकांना शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी.
- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभागीय रिक्षा-टॅक्सी महासंघ

लॉकडाऊनमुळे लक्ष्मी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपाने चार महिन्यांपासून दुकाने उघडू दिलेली नाही. आयुक्तांकडे मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अन्नधान्य मार्केटला मुभा दिली जाते, मात्र भाजीविक्रेत्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.
- मोहन नाईक, पदाधिकारी,
भाजीविक्रेता संघटना

Web Title: Lockdown of Kalyan, Dombivali increased due to Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण