Lockdown News: ठाकुर्ली पॉवरहाउस परिसरात अडकले ५२ भंगार कामगार; ठेकेदाराने सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 12:21 AM2020-05-04T00:21:51+5:302020-05-04T00:22:01+5:30

दोन महिने पगाराविना; वेल्डरचा समावेश

Lockdown News: 52 scrap workers stuck in Thakurli powerhouse area; The contractor left in the wind | Lockdown News: ठाकुर्ली पॉवरहाउस परिसरात अडकले ५२ भंगार कामगार; ठेकेदाराने सोडले वाऱ्यावर

Lockdown News: ठाकुर्ली पॉवरहाउस परिसरात अडकले ५२ भंगार कामगार; ठेकेदाराने सोडले वाऱ्यावर

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ठाकुर्ली पश्चिमेतील रेल्वेच्या पॉवरहाउसनजीक रेल्वेचे लोखंडी भंगार तोडण्यासाठी, त्या सामानाचे कटिंग करून ते उचलणे, गोळा करणे यासाठी ठेकेदारी तत्त्वावर काम सुरू आहे. मात्र, अचानक लागू झालेल्या लॉकडाउनमुळे येथे काम करणारे ५२ कामगार अडकून पडले आहेत. ठेकेदाराने दोन महिन्यांपासून पगारच दिला नसल्यामुळे या कामगारांची उपासमार होत आहे. या भागात मदतही पोहोचत नसल्यामुळे हे कामगार हतबल झाले असून ठेकेदारानेच वाºयावर सोडल्यामुळे आता मदत तरी कोणाकडे मागायची? असा सवाल ते करत आहेत.

रेल्वेच्याच ठाकुर्ली पश्चिमेकडील एका जुन्या इमारतीमध्ये हे कामगार वास्तव्यास आहेत. हे परप्रांतीय कामगार असून त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जायला मिळणार, असा संदेश मिळताच त्यांनी तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना ‘ह’ प्रभागात पाठवण्यात आले; मात्र तेथे आधी टाळाटाळ झाली.

अखेर रविवारी सकाळी त्यांनी फॉर्म भरून दिला असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. गावी जाण्यास परवानगी मिळाली तरी त्यासाठी पैसे कुठून आणायचे? ठेकेदाराने हेल्परला दिवसाला ५५० रुपये ठरवून येथे आणले. मात्र, लॉकडाउनमुळे कामच बंद झाले. जेवढे पैसे होते, ते खर्च झाले आहेत. दुकानेही बंद असतात. कोणाची मदत आली तर अन्नपाकिटांवर तो दिवस जातो; अन्यथा उपासमार होत असल्याची व्यथा या कामगारांनी मांडली. आता १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. काहींच्या मते जूनपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याने आमच्या हालात भर पडणार आहे. आम्हाला उत्तर प्रदेशातील आमच्या गावाला जायचे आहे. तेथे जाण्यासाठी तरी पैसे द्या. ठेकेदाराने आमचे थकलेले वेतन द्यावे आणि जाण्याची व्यवस्था करावी. आम्हाला आता काहीच सुचत नसून कोणी तरी आम्हाला मदत करावी आणि या संकटातून सोडवावे, अशी याचना कामगारांच्या वतीने आनंद यादव, अखिलेश यादव, नागेंद्र चौरसिया आदींनी केली.

आम्ही २५ जानेवारीपासून येथे कामाला आलो आहोत. ठेकेदाराचे गॅसकटिंग, ट्रकमध्ये भंगार सामान लोड करण्याचे काम सुरू होते. दोन महिन्यांपासून हाल सुरू आहेत. फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पगार दिला आहे. पण मार्च, एप्रिलमध्ये आम्हाला पगार मिळालेला नाही. दोन वेळा हजार रुपये दिले होते, पण आता तेही मिळत नाहीत. - सुरेश कनौजिया, कामगार

शहरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी कागदोपत्री मदत करण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये उकळणाºया संस्थेच्या अध्यक्षाविरोधात नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारने कामगारांना गावाला जाण्याचा मार्ग खुला केल्याने कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु आवश्यक परवान्यासाठी कामगारांना आॅनलाइन अर्ज भरणे जमत नाही. त्याचाच गैरफायदा घेत मीरा-भार्इंदर कामगार वेल्फेअर संस्थेने कामगारांना सभासद प्रवेश फी या नावाखाली २०० रुपये भरा आणि अर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवले. सभासद फी म्हणून पावतीही दिली जात होती. काहींनी व्हिडीओ व्हायरल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Lockdown News: 52 scrap workers stuck in Thakurli powerhouse area; The contractor left in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.