Lockdown News: उल्हासनगरात चक्क फटाक्याची वाहतूक, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:57 AM2020-05-24T11:57:32+5:302020-05-24T11:57:41+5:30

उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका व पोलिसा कडून होत असलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र शहरात आहे.

Lockdown News: Firecrackers transported in Ulhasnagar, crime registered | Lockdown News: उल्हासनगरात चक्क फटाक्याची वाहतूक, गुन्हा दाखल

Lockdown News: उल्हासनगरात चक्क फटाक्याची वाहतूक, गुन्हा दाखल

Next

उल्हासनगर : लॉकडाऊन दरम्यान फटाक्याची वाहतूक केल्या प्रकरणी महादेव ट्रेडर्स दुकानदारासह तिघांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिका व पोलीस प्रशासनाने गेल्या दोन दिवसात छुप्या पद्धतीने दुकानें सुरु ठेवल्या प्रकरणी कारवाई सुरू करून अनेकावर गुन्हे दाखल केले. 

उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका व पोलिसा कडून होत असलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र शहरात आहे. शहरात छुप्या पद्धतीने कपडे, चप्पल, प्लास्टिक आदी असंख्य दुकानें मध्यरात्री ते सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान शटर बंद करून सुरु असल्याची ओरड झाल्यावर, गेल्या दोन दिवसापासून महापालिका व पोलीस प्रशासन संयुक्तपणे दुकानावर कारवाई करीत आहेत. कारवाई दरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता कॅम्प नं -२ येथील महादेव ट्रेडर्स फटाक्याच्या दुकानात ट्रक मधून आणलेले फटाके उतरवित असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फटाक्याच्या बॉक्सने भरलेला ट्रक ताब्यात घेतला.

 उल्हासनगर पोलिसांनी फटाक्याच्या बॉक्सनें भरलेला ट्रक ताब्यात घेतला असून फटाक्याची किंमत लाखोच्या घरात आहे. दुकानदार सागर चीचारिया यांच्यासह तिघा विरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकाराने शहरात छुप्या पद्धतीने दुकाने सुरु असल्याचे उघड झाले असून पोलीस व महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Web Title: Lockdown News: Firecrackers transported in Ulhasnagar, crime registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.