Lockdown: लॉकडाऊनच्या मदतीला सर आली धावून; ठाण्यात मार्केटमधील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:26 AM2020-07-04T00:26:35+5:302020-07-04T00:26:46+5:30

उरलेसुरले भटकेही बसले घरी; सखल भागांमध्ये साचले पाणी

Lockdown: Sir came running to help the lockdown; The crowd in the market in Thane subsided | Lockdown: लॉकडाऊनच्या मदतीला सर आली धावून; ठाण्यात मार्केटमधील गर्दी ओसरली

Lockdown: लॉकडाऊनच्या मदतीला सर आली धावून; ठाण्यात मार्केटमधील गर्दी ओसरली

Next

ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाणे महापालिकेने १२ जुलैपर्यंत घेतलेल्या लॉकडाऊनमध्ये काही नागरिक रस्त्यावर फिरत होते. मात्र, शुक्रवारी दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे भटके, फिरस्ते घरी किंवा वळचणीला बसल्याने लॉकडाऊन करणाऱ्या प्रशासनाच्या मदतीला पाऊस धावून आला.

गुरुवारपासून लॉकडाऊन सुरू झाला. शहरातील जांभळीनाका आणि इंदिरानगर भागांतील मार्केट सुरू होते. साहजिकच, तेथे भाजीपाला खरेदी करण्याकरिता गर्दी झाली होती. परंतु, दुसºया दिवशी सकाळपासूनच पावसाने शहराच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावल्याने या दोन्ही बाजारपेठांमधील गर्दी ओसरल्याचे दिसले. पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावल्याचे दिसत होते. मात्र, भरपावसातही वाहतूक पोलिसांचा खडा पहारा असल्याचे दिसत होते. प्रमुख बाजारपेठा वगळता शहरातील इतर भागांतील अत्यावश्यक सेवेची दुकाने मात्र बंद होती. याठिकाणी दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना दम देऊन ती बंद करण्याचे प्रकार सुरू होते. ठिकठिकाणी पोलिसांची कडक नाकाबंदी, शटरबंद दुकाने, ओस रस्त्यांमुळे ठाण्यात ‘कर्फ्यू’सदृश शांतता पसरली होती.

पाऊस सुरू झाल्यावर सर्वसाधारणपणे लहान मुले भिजायला रस्त्यावर उतरतात, तरुण-तरुणींचे घोळके तलावपाळी, उपवन परिसरात मौजमस्ती करतात. चहाच्या टपºया तसेच भजी-बटाटेवडे फस्त करण्याकरिता गर्दी होते. मात्र, शुक्रवारी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ना लहान मुले रस्त्यावर दिसली ना तरुण-तरुणींचे घोळके दिसले. सारेच बंद असल्याने पावसाची मजा अनेकांनी घरीच चहा आणि भजी खाऊन लुटली. टीएमटीच्या बसेसमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक दिसली नाही. ठाण्यात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते. गेले काही दिवस ठाणेकर कोरोनाइतकेच उकाड्याने हैराण झाले होते. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने हवेत गारवा जाणवत नव्हता. शुक्रवारच्या दिवसभराच्या वृष्टीने जिल्ह्यातील वातावरणात गारवा आला.

शासनाच्या निर्देशानुसार जीवनाश्यक वस्तूंसाठी ठाणे महापालिकेने सवलत दिली असली, तरी त्याचा कुणी गैरफायदा घेणार नाही, याची खबरदारीही घेतली जात आहे. विक्रेत्यांकडे एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी जमणार नाही, दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राहील, याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात येणार आहे.

शहरात शुक्रवारी सकाळपासून वाºयासह पावसाला सुरुवात झाली. दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे शहरात झाडे, झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या तुरळक घटना वगळता कोणतीही मोठी घटना घडली नाही. आठ तासांत शहरात ६७.३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे शहरात काही दिवसांपासून ऊनपावसाचा खेळ सुरू होता. शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढगांनी गर्दी केली व दमदार पावसाला सुरूवात झाली. दुपारी काहीवेळ वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. शहरातील काही ठिकाणी पाणी तुंबले. झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मागील २४ तासांत १६.४९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात झाल्यावर झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या आठ तक्रारींची नोंद झाली आहे.

पावसामुळे बळीराजा सुखावला
टिटवाळा : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्र वारी दुपारी २ च्या सुमारास टिटवाळा शहर व ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जूनमध्ये पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर तो गायब झाला होता. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. शुक्रवारी पावसाचे पुनरागमन झाले. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येईल, अशी माहिती शेतकºयांनी दिली.

डोंबिवलीत पावसाच्या सरी
डोंबिवली : निसर्ग चक्रीवादळानंतर दडी मारलेल्या पावसाने महिनाभरानंतर शुक्रवारी सकाळपासून शहरात दमदार हजेरी लावली. दिवसभर सरींवर सरी पडत असल्यातरी वातावरणात उकाडा कायम होता. लॉकडाऊनमुळे सकाळपासून नागरिक फरासे घराबाहेर पडले नव्हते. त्यात पावसाने हजेरी लावल्याने सकाळी ११ नंतर रस्त्यावरील तुरळक गर्दीही रोडावली. दरम्यान, शहरात कुठेही पाणी साचल्याच्या तसेच झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Lockdown: Sir came running to help the lockdown; The crowd in the market in Thane subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.