ठाण्यात सोमवारपासून लॉकडाऊन? लवकरच जाहीर करणार हॉटस्पॉटची ठिकाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:45 PM2020-06-27T19:45:03+5:302020-06-27T19:49:15+5:30
प्रभाग समिती निहाय हॉटस्पॉटची संख्या निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांबरोबर चर्चा करून लवकरच शहरातील हॉटस्पॉट जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे : अनलॉकनंतर ठाणे शहरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ झाली असून कंटेनमेंट झोनमध्ये बरोबरच संपूर्ण ठाणे शहरात सोमवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याशिवाय, शहरातील हॉटस्पॉटमध्ये पूर्णपणे कडक निर्बंध लावण्यात येणार असून या क्षेत्रात नागरिकांच्या बाहेर येण्याजाण्यावर देखील निर्बंध लावण्यात येण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग समिती निहाय हॉटस्पॉटची संख्या निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांबरोबर चर्चा करून लवकरच शहरातील हॉटस्पॉट जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी देखील परिस्थिती बघून लॉकडाऊन करण्याचा निर्णय संबंधित सहाय्यक आयुक्तांवर देण्यात आली सोमवारी यासंदर्भांत अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.
अनलॉकनंतर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा कमालीचा वाढायला सुरवात झाली असून मृत्युदरही वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या कमी करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासना समोर आहे. ठाण्यात आता दररोज १५० पेक्षा अधिक रुग्ण सापडत असून यामुळे ठाणे शहराच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शुक्रवारी तर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकड्याने तर उच्चांक गाठला असून ३६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ६४ नव्या रुग्णांची नोंद ही माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये झाली असून त्यानंतर नौपाडा-कोपरी, वागळे आणि कळवा त्यांनतर लोकमान्य-सावरकर नगरमध्ये जास्त प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या कळत लोकमान्य -सावरकर नगरमध्ये रुग्णांचा आकडा हा जास्त प्रमाणात होता मात्र त्यानंतर काही प्रमाणात या रुग्णवाढीवर अंकुश ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते.
आता हा रुग्णावढीचा जोर जवळपास सर्वच प्रभाग समितीमध्ये वाढत असून शुक्रवारच्या आकड्यांतर संपूर्ण ठाणे शहरातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मुंब्र्यात तीन ठिकाणी हॉटस्पॉट तयार करण्यात आले असून या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून कोरोना वॅरियर्स आणि पोलीस देखील तैनात करण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त महेश आहेर यांनी दिली आहे.
अनलॉकच्या काळात प्रत्येक प्रभाग समिती निहाय असलेल्या दुकानांना पी१ आणि पी २ अशा पद्धतीने दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागल्याने सर्वच प्रभाग समितीमध्ये हीच परिस्थिती असल्याने आता पुन्हा एकदा परिस्थिती बघून संपूर्ण प्रभाग समित्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जवळपास झाला असून यांदर्भातील अद्यादेश सोमवारी येण्याची शक्यता आहे.
आणखी बातम्या...
शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार
"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका
'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! रुग्णांची संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचा डोंबिवलीत मोर्चा, पण फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा