उल्हासनगरात २२ जुलै पर्यंत लॉकडाऊन - आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 07:53 PM2020-07-11T19:53:45+5:302020-07-11T19:55:17+5:30

रविवारी १२ जुलै रोजी लॉकडाऊन संपणार होता. दरम्यान शेजारील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढविल्याने

Lockdown in Ulhasnagar till July 22 - Commissioner's order | उल्हासनगरात २२ जुलै पर्यंत लॉकडाऊन - आयुक्तांचे आदेश

उल्हासनगरात २२ जुलै पर्यंत लॉकडाऊन - आयुक्तांचे आदेश

Next

उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी लॉक डाऊन २२ जुलै पर्यंत वाढविला. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले असून व्यापारी संघटनेने लॉकडाऊनला पाठिंबा दिला. उल्हासनगरात कोरोनाची संख्या ३७०० पेक्षा जास्त झाल्याने महापालिका आरोग्य सेवेवर ताण वाढला आहे. कोरोना संसर्गाचा आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी अखेर २ ते १२ जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर केला होता. मात्र लॉकडाऊन काळात रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी एका आठवड्यात १७०० पेक्षा जास्त वाढल्याने महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

रविवारी १२ जुलै रोजी लॉकडाऊन संपणार होता. दरम्यान शेजारील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढविल्याने, महापालिकेने लॉक डाऊन वाढविण्यासाठी सर्वच स्तरातून बोलले जात होते. अखेर आयुक्तांनी शनिवारी एक प्रसिद्ध पत्रक काढून लॉकडाऊन १२ ते २२ जुलै पर्यंत वाढविल्याचे जाहीर केले. शहरवासीयांनी लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले असुन जीवनावश्यक वस्तूचे दुकान, भाजीपाला, दूध यांच्यासह मेडिकल नेहमी प्रमाणे विशिष्ट वेळेत सुरु राहणार आहे. दुकानदारांना ग्राहकांच्या घरपोच साहित्य द्यावे लागणार आहे. लॉकडाऊनचे नागरिकांसह इतरांनी तंतोतंत पालन केल्यास कोरोणावर विजय मिळवणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. दरम्यान विविध व्यापारी संघटनेने, नागरिकांचे हित साधून लॉकडाऊनचे समर्थन केले.

Web Title: Lockdown in Ulhasnagar till July 22 - Commissioner's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.