Lockdown: दाढीचे काय करायचे? गिऱ्हाईकांसह व्यावसायिकांमध्येही संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:50 AM2020-06-29T00:50:10+5:302020-06-29T00:50:27+5:30
लक्ष्मीपार्क परिसरातील सरताज शेख यांचा अनुभव काहीसा वेगळा होता. त्यांनी प्रोफेशनल व्यावसायिकाप्रमाणेच दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवले
जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०५ दिवसांनी ठाण्यासह राज्यभरात नाभिक व्यावसायिकांना आपली केश कर्तनालयाची दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली. रविवारी कामाचा पहिलाच दिवस. गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने गिºहाईकांनीच पाठ फिरवली.
काही ठिकाणी गिºहाईकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि अवजारांचे निर्जंतूकीकरण करण्यातच बहुतांश वेळ गेल्याने अनेकांच्या पदरी पहिल्याच दिवशी निराशा पडल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. अनेक व्यावसायिकांची दुकाने नियमांचे पालन करीत १ जूनपासून सुरुही झाली होती; पण नाभिक समाजाला व्यावसायाची परवानगी नसल्याने नाराजी होती. आता सशर्त परवानगी मिळाली; पण पीपीई किट घालणे, केस कटींग करा पण दाढीला हात लावू नका, सॅनिटायजरपासून अवजारांचे निर्जंतूकीकरण करा, अशा अनेक अटी घातल्यामुळे नेमका व्यवसाय करायचा तरी कसा, असा सवाल नाभिक व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे.
ठाण्यात सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त सलून व्यावसायिक आहेत. गेल्या अडीच तीन महिन्यांमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जवळचे सर्व पैसे संपल्याने पीपीई किट, सॅनिटायझेशन किंवा अन्य बाबींसाठी लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची? केस कर्तनासाठी १० ते ५० रुपयांची वाढ केली, तर ठराविक लोक त्याचे स्वागत करतात. पण अनेकजण नाक मुरडणारेही आहेत, असे यशोधननगर येथील व्यावसायिक पुरुषोत्तम खरे यांनी सांगितले. पीपीई किट घालून काम करणे मोठे जिकरीचे असल्याचेही ते म्हणाले. पहिलाच दिवस, अगदी रविवार असूनही गिºहाईक नेहमीसारखे केस कटिंगसाठी फिरकलेच नाही. पुढे कसे होणार? पुन्हा लॉकडाऊन होते की काय? असे प्रश्न खरे यांच्या डोक्यात घरघर करत आहेत. कामापेक्षा अवजारांचे निर्जंतुकीकरण करण्यातच बराच वेळ गेल्याचेही ते म्हणाले.
लक्ष्मीपार्क परिसरातील सरताज शेख यांचा अनुभव काहीसा वेगळा होता. त्यांनी प्रोफेशनल व्यावसायिकाप्रमाणेच दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवले. चारपेक्षा अधिक गिºहाईकांना आत प्रवेश नाही. स्वत:ला मास्क आणि गिºहाईकांना नवे कोरे अॅप्रन दिले. अशा अनेक सोयी केल्याने केस कर्तनासाठी वाढीव दर आकारुनही गिºहाईकांनी स्वागत केले. तूर्त दाढी करण्याला परवानगी नाही, हे आमच्या आरोग्याच्यादृष्टीनेही योग्य असल्याचे ते म्हणाले.
पीपीई किट तसेच निर्जंतूकीकरणाचे नियम नाभिक व्यावसायिकांनाही आवश्यक आहे. परंतू, पीपीई किट कापडी आणि सुटसुटीत मिळावे. पी१ आणि पी२ मधून या व्यावसायिकांना वगळावे. दाढी करण्यालाही परवानगी मिळावी. व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी. - अरविंद माने, खोपट, ठाणे