दुकानदारांकडून निर्बंधांनाच कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:31+5:302021-03-13T05:13:31+5:30
कल्याण-डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य ...
कल्याण-डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने सातनंतर बंद करण्याचा आदेश दिला असतानाही कल्याण व डोंबिवलीत अनेक दुकाने सातनंतरही उघडी होती. पोलिसांची गाडी येताना पाहून अनेक दुकानदार दुकानांचे शटर खाली ओढत होते. मात्र पोलीस दिसेनासे होताच पुन्हा दुकाने उघडत होते. त्याचवेळी सरबत, वडापाव, भेळपुरी, चायनीजच्या गाड्यांनी निर्बंध पाळल्याचे दिसत होते.
महापालिका हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आज या निर्बंधांचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी दुकाने बंद करण्याकरिता फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेक दुकाने सात वाजून गेले तरी उघडीच होती. पोलिसांनी गाडी थांवबून दुकाने उघडी असलेल्या दुकानदारांना तंबी दिली. कोरोनाचे नियम पाळा, पोलिसांना उगाच कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले. मात्र काही मोजक्या दुकानदारांनी सातच्या आतच दुकानाचे शटर डाऊन केले होते. खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या हातगाड्यांनाही सातपर्यंत व्यवसायाची मुभा असल्याने या गाड्या बंद झाल्या. मात्र दुकानदारांनी लॉकडाऊनचे निर्बंध फारसे मनावर घेतलेले नाहीत.
...........
वाचली.