उल्हासनगरात शनिवारी लोकन्यायालायाचे आयोजन; मालमत्ता कर बुडव्याना पुन्हा एक संधी

By सदानंद नाईक | Published: December 7, 2023 06:20 PM2023-12-07T18:20:33+5:302023-12-07T18:20:57+5:30

शनिवारी ९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्याची संधी महापालिकेने करबुडव्यांना दिली आहे.

Lok Nyayalaya held in Ulhasnagar on Saturday Another opportunity to reduce property taxes | उल्हासनगरात शनिवारी लोकन्यायालायाचे आयोजन; मालमत्ता कर बुडव्याना पुन्हा एक संधी

उल्हासनगरात शनिवारी लोकन्यायालायाचे आयोजन; मालमत्ता कर बुडव्याना पुन्हा एक संधी

उल्हासनगर : शनिवारी ९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्याची संधी महापालिकेने करबुडव्यांना दिली आहे. दिवाळीपूर्वी आयोजित केलेल्या लोकन्यायालायात एकाच दिवसी साडे ११ कोटींची थकीत मालमत्ता कराची वसुली झाली होती.

 उल्हासनगर महापालिकेने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ करणे, मालमत्तांचे कर निर्धारण व कर आकारणी संदर्भात वाद असलेली प्रकरणे, दुबार नोंद व इतर कारणास्तव असलेल्या नोंदी रदद करुन त्यावरील कर आकारणी निर्लेखित करणे आदी प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेने अभय योजनेचे आयोजन लोकन्यायालाय अंतर्गत केले होते. त्यातून साडे अकरा कोटी रुपयांची वसूली झाली होती. गेल्या ९ महिन्यात मालमत्ता कराची एकून ५३ कोटीची वसुली झाली असून यावर्षी १०० कोटीचे टार्गेट विभागाला पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने पुन्हा अभय योजने अंतर्गत लोकन्यायालायचे आयोजन करून जास्तीत जास्त मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ठेवले आहे. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, कर निर्धरक व संकलक जेठानंद करमचंदानी यांची टीम त्यासाठी सक्रिय झाली आहे.

 महापालिका मालमत्ता कर विभागाने दोन वर्षांपूर्वी ११० कोटीचा वसूलीचा आकडा गाठला होता. मात्र गेल्या वर्षी फक्त एकून ६४ कोटींची वसुली झाल्याने, विभागावर सर्वस्तरातून टीका झाली होती. यावर्षी पुन्हा मालमत्ता कर विभागाने कंबर कसली असून १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या वर्षाच्या ९ महिन्यात ५३ कोटीची वसुली झालीं असून मार्च महिना अखेर पर्यंत १०० कोटीचा वसुली आकडा गाठावा लागणार आहे. मोठ्या थकबाकीधारकावर नोटिसा, मालमत्तेची जप्ती, लिलाव आदींच्या कारवाईचे संकेत मालमत्ता कर विभागाने दिले आहे.

Web Title: Lok Nyayalaya held in Ulhasnagar on Saturday Another opportunity to reduce property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.