राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 07:30 AM2024-04-30T07:30:48+5:302024-04-30T07:39:02+5:30
मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती २५ कोटी ८२ लाख ९७ हजार असल्याचे जाहीर केले. मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली.
२०१९ मधील एकूण मालमत्ता
(१४,५९, ८०, १९८)
एकूण संपत्ती ११, ७६, ८६, ८३५
जंगम मालमत्ता २,०१,१५,२००
पत्नी नंदिनी विचारे २,८२,९३,३६३
रोख रक्कम २,००,०००
वारसा हक्काने ९,००,०००
कर्ज ४,१८,५७,४६१
गुन्हे ९ फौजदारी गुन्हे
वाहने : फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ, पत्नी नंदिनीच्या नावे टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती : रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका : ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.
शिक्षण : एफवायजेसी
२०२४ मधील एकूण मालमत्ता
(२५,८२,९७,०००)
रोख रक्कम १,२०,०००
पत्नीकडे ६०,०००
जंगम १,३२,५५,१२५
पत्नीकडे २,४०,३२,५०२
स्थावर ५,६४,४५,५०३
पत्नीकडे ७४,५६,४२०
कर्ज ३,२४,७८,८८४
पत्नीकडे ९४,२०,२३२
वारसा हक्काने १६,९४,६३१
गुन्हे ६ फौजदारी गुन्हे
वाहने : हुंदाई व्हर्ना, पत्नी नंदिनीच्या नावे इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
एक पिस्तुलही विचारे यांच्याकडे आहे.
शेती: रत्नागिरी पोमेंडी, अलिबाग अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका : ठाण्यात रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मीरा-भाईंदर गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथे दुकान, चेंदणी येथे दुकान.