कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदेसह ठाणे, भिवंडीत लोकसभेसाठी आज १३ उमेदवारी अर्ज दाखल
By सुरेश लोखंडे | Published: May 2, 2024 05:25 PM2024-05-02T17:25:31+5:302024-05-02T17:27:45+5:30
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सुरेश लोखंडे,ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कल्याणमधून विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी माेठ्या शक्ती प्रदर्शनात आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांनी तब्बल ४ अर्ज दाखल केले.
ठाणे लाेकसभेसाठी विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी केली आहे. यामध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार राजेंद्र संखे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय घाटे, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे उत्तम तिरपुडे, हिन्दु समाज पार्टीचे भवरलाल मेहता यांनी पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. तर अपक्ष राजीव भोसले व खाजासाब मुल्ला या दोन अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार संभाजी जाधव, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जामील अहमद जुबेर खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अपक्ष उमेदवार प्राजक्ता येलवे, अश्विनी केंद्रे, मोहम्मद यूसुफ खान (दिव्यांग) आणि चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर भिवंडीतून कांचन वाखारे यांनी अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
ठाणे लाेकसभा मतदारसंघासाठी आज १२ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिवसेना (शिंदे गट)चा अर्ज वाटप करण्यात आले. तर वंचित बहुजन आघाडीसाठी तीन, बहुजन समाज पार्टीसाठी दाेन अर्ज वाटप झाले आहे. तर भारत महापरिवार पार्टी, भिमसेना आणि अपक्ष आदींनी प्रत्येकी एक अर्ज घेतला आहे.