कपिल पाटील यांच्या संपत्तीत ३८ कोटींनी वाढ; पत्नीची संपत्ती १२ कोटींनी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:04 PM2024-04-30T12:04:21+5:302024-04-30T12:05:04+5:30
पाटील यांची पत्नी मीनल यांची संपत्ती २०१९ मध्ये १५ कोटी ४३ लाख ८६४ रुपये होती. २०२४ मध्ये २७ कोटी ७१ लाख ७५ हजार ५९० इतकी झाली आहे.
भिवंडी : भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची एकूण संपत्ती १०४ कोटी ३६ लाख, ४६ हजार ५३६ एवढी असून मागील २०१९ च्या निवडणुकीत त्यांची संपत्ती ६६ कोटी ९ लाख ६२ हजार ३०९ इतकी होती. मागील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये ३८ कोटी २६ लाख ८४ हजार २२४ रुपयांनी वाढ झाली.
पाटील यांची पत्नी मीनल यांची संपत्ती २०१९ मध्ये १५ कोटी ४३ लाख ८६४ रुपये होती. २०२४ मध्ये २७ कोटी ७१ लाख ७५ हजार ५९० इतकी झाली आहे. त्यांच्या पत्नीची संपत्ती १२ कोटी २८ लाख ७४ हजार ७२६ रुपयांनी वाढली.
२०१९ मध्ये एकूण संपत्ती
एकूण संपत्ती ६६,०९,६२,३०९
रोख २,५३,९८,३५३
पत्नी मीनल ३२,६९,२१८
जंगम मालमत्ता ३८८,४९,५८५
पत्नी १,९६,४३,८४६
स्थावर १,२७,४४,८३०
वारसाहक्काने १२,०६,५५,०००
कर्ज २१,०७,९५२
वाहने - बीएमडब्लू, महिंद्रा जीप, पत्नीच्या नावे टाटा सफारी, दोन इनोव्हा, एक अशोक डंपर,
शेती - दिवा अंजुर ,वडपे, सिंधुदुर्ग ओझरली येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील वसंत विहार येथे सदनिका
शिक्षण – बीए
२०२४ मध्ये एकूण संपत्ती
एकूण संपत्ती १०४,३६,४६,५३६
रोख रक्कम ८५,९२,३६१
पत्नीकडे ३५,४५,८२०
जंगम ७,३२,५२,८७७
पत्नीकडे १,४१,३९,८२६
स्थावर २,१०,९६,७५४
पत्नीकडे १,४६,४३,५८५
पत्नीकडे कर्ज २९,३७,८२७
वारसाहक्काने २२,६६,३२,५००
वाहने - बीएमडब्ल्यू, लेक्सस, महिंद्रा जिप, पत्नीच्या नावे दोन इनोव्हा,डम्पर,
सदनिका - ठाणे वसंत विहार, तसेच पत्नीच्या नावे लोणावळ्याला बंगला
शेती - वडपे,दिवे अंजुर येथे शेती ,सिंधुदुर्ग येथे बिनशेती जमीन,पत्नीच्या नावे दिवे अंजुर वडपा येथे जमीन