ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
By अजित मांडके | Published: May 20, 2024 01:47 PM2024-05-20T13:47:03+5:302024-05-20T13:54:05+5:30
ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
अजित मांडके,ठाणे : ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यानेच या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्याच ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दुसरीकडे येथील बाजूला असलेल्या सेंट जॉन शाळेत गेलेल्या एका मतदाराने सुध्दा बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. भरत दामजी बव्वा हे आपल्या पत्नी सोबत मतदान करण्यासाठी आले असता त्यांच्या नावा समोर अधिच मतदान झाले असल्याची टिक दिसून आली. म्हणून त्यांनी याचा जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मी त्यांना मतदान ओळखपत्र, आधारकार्ड दाखवले मात्र, तरी सुद्धा तुमचे मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल त्यांनी केला.
ठाण्यात बोगस मतदानाचा सुळसुळाट-
मतदारांनी मतदार केंद्रावर जाऊन टेंडर वोट करण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर ,धर्मवीर आनंद दिघे व भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रावर सकाळी लवकर बोगस मतदान झालेले आहे. मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्यांनी केलं आहे. यासाठी आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपले मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ नंबर चा फॉर्म भरून पोस्टल बॅलेट द्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजन विचारे यांनी मतदारांना केले आहे.
मुख्यमंत्र्याना प्रत्यूत्तर-
कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही. ते 50 जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील त्यांचा काय भरोसा, असं देखील आव्हाड म्हणाले.
बोगस मतदान असल्याचा गंभीर आरोप-
ठाण्यात बोगस मतदान जोरदार सुरू आहे, शासकीय यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत, जिथे त्यांना मतदान कमी होणार आहे तिथे मशीन त्यांनी स्लो केल्या जातं आहेत.
एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर पूर्ण दिवसात 120 च मतदान होईल, यादी ही चौदाशेची आहे, निवडणूक आयोग जर कोणाच्या हाताचा भावलं बनवून काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून मशीन स्लो करणार असतील तर निवडणुकाच घेऊ नका त्या रद्द करून टाका. असं मत त्यांनी व्यक्त केलं.
बोगस मतदान करत आहेत, मतदान मशीन स्लो करत आहेत, मुद्दामून मतदारांना काहीही कारण देत आहेत, निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करत आहेत आम्ही जाहीर आरोप करत आहे. शिवाय हे मतदान मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत आहे म्हणूनच बोगस होत आहे, सर्वच प्रशासकीय यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. या संदर्भात त्यांनी भाष्य केलं.
दोन हजार लोक बाहेरून बोगस मतदान करायला त्यांनी आणली होती, दहा बोगस मतदान महाराष्ट्र शाळेत झालेली आहेत.पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
निवडणूक वातावरण-
निवडून ही कोणत्याही दबावाखाली होता कामा नये, हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही, दहशतीने देश जिंकता आलं असतं.
ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जातेय ही लाज आणणारी गोष्ट आहे, शासनाचा इतका हस्तक्षेप चांगला नाही, सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन आलेला नाही हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो वा कोणताही आतला कर्मचारी असो सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन आलेला नाही.मुद्दामून मशीन स्लो केलं जातंय, जिथे मराठी मतं कमी पडत आहेत असं कळतंय तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मांडल मत-
राज ठाकरे यांचा कोणाला पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरण त्यांच्या उमेदवारावरनं मी त्यांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरून कळतंय. तसेच राज ठाकरे यांचा फक्त स्वतःला पाठिंबा आहे, ते म्हणजे विश्व आहेत, अहम ब्रह्मास्मि, जग काही नाही, त्यांच्यासमोर उठा दुपारी घ्या सुपारी, भाजपने राज ठाकरे यांना ठाण्याचं वातावरण खराब करण्याची सुपारी दिली आहे, म्हणत त्यांनी टिकास्त्र सोडलं.