युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

By सुरेश लोखंडे | Published: May 11, 2024 04:28 PM2024-05-11T16:28:30+5:302024-05-11T16:30:16+5:30

ठाणे शहरात ‘रन फॉर व्होट’ ही मिनी मॅरेथॉन आयाेजित केली असता त्यास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

lok sabha election 2024 youths do their national duty by participating in voting thane collector's appeal young voters | युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

सुरेश लोखंडे, ठाणे : शहरात ‘रन फॉर व्होट’ ही मिनी मॅरेथॉन आयाेजित केली असता त्यास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असता त्यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे, यांनी युवकांना मार्गदर्शन करीत मतदान प्रक्रियेत माेठ्या संख्येने सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे मार्गदर्शन केले.

 ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर व्होट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. मतदान करण्याचा समान हक्क प्राप्त झालेल्या प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धे निमित्त स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच... आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेल्या माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले.यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

Web Title: lok sabha election 2024 youths do their national duty by participating in voting thane collector's appeal young voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.