‘लोकसभा निवडणूक रिपाइंने स्वतंत्र लढवावी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:55 AM2019-03-06T01:55:13+5:302019-03-06T01:55:23+5:30

लोकसभा जागा वाटपात रिपाइंला वाऱ्यावर सोडत एकही जागा दिलेली नाही.

'Lok Sabha elections should be fought independently' | ‘लोकसभा निवडणूक रिपाइंने स्वतंत्र लढवावी’

‘लोकसभा निवडणूक रिपाइंने स्वतंत्र लढवावी’

उल्हासनगर : लोकसभा जागा वाटपात रिपाइंला वाऱ्यावर सोडत एकही जागा दिलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे भाजपा-शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी रिपाइने स्वतंत्र उमेदवार उभा करावा असे मत कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे व्यक्त केले. दरम्यान, आठवले यांनी कार्यकर्त्यांना ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला दिला आहे.
पक्षाचे केेंंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश सावंत यांच्या सांत्त्वनासाठी आठवले उल्हासनगरमध्ये आले होते. गेल्या आठवडयात सावंत यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच आजारी असलेले रिपाइ नेते सीता सांवत यांचीही भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. पत्रकार परिषदेत आठवले यांनी लोकसभेची एकही जागा सोडली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा, निवडणुका लढविल्यास अप्रत्यक्ष भाजपा-शिवसेना युतीला फायदा होईल असा दावा केला.
>रिपाइंच्या ऐक्यासाठी अनेकदा पुढाकार घेतला असून ऐक्याचे अध्यक्षपद आंबेडकर यांना देण्यास तयार आहे. त्यासाठी केंंद्रीय मंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचे आठवले म्हणाले. एक जागा युतीने रिपाइला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करणार आहे.

Web Title: 'Lok Sabha elections should be fought independently'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.