लोकसभा विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार

By अजित मांडके | Published: October 9, 2023 04:16 PM2023-10-09T16:16:04+5:302023-10-09T16:17:36+5:30

आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का? यावर शिंदे काय म्हणाले...

Lok Sabha elections will be faced as a Alliance; Eknath Shinde told | लोकसभा विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार

लोकसभा विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र पणे लढू. या दोन्ही निवडणुकांना आम्ही महायुती म्हणूनच समारो जाऊ. अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील एका हॉटेल मध्ये रविवारी रात्री शिवसेनेच्या प्रवकत्यांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. त्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थितीत होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. 

 राज्यात आमच्या तिघांचे ही चांगले काम सुरु आहे.सध्या राज्याचा जो विकास वेगाने होत आहे. यात आमच्या तिघांची टीम अत्यंत उत्तमरित्या काम करत आहे. यापूर्वी राज्याच्या विकासासाठी चांगले काम करण्याचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिला आहे. त्यामुळे फडणवीस आणि आम्ही धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आगामी  लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत असणे आवश्यक आहेत. तसेच त्यानंतरची पुढची विधानसभेची लढाई देखील आम्हीच जिंकणार. आम्ही एकदिलाने काम करत असल्याचेही ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघे एकत्रच लढु असे त्यांनी आश्वासित केले. राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्याकरिता फडणवीस यांच्याकडे असलेला अनुभव आवश्यक आहे. तसेच आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का? हा त्यांचा वेयक्तिक तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आधीच खुलासा केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रवक्तत्यांच्या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे, केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय लोकहिताचे निर्णय जनते पर्यंत सकारात्मकदुष्ट्या पोहचले पाहिजे या दृष्टीने चर्चा झाली. प्रवकत्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती मुखमंत्र्यांनी दिली.
 

Web Title: Lok Sabha elections will be faced as a Alliance; Eknath Shinde told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.