नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 06:35 AM2024-05-04T06:35:46+5:302024-05-04T06:37:55+5:30
यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची एकूण संपत्ती २६ कोटी २६ लाख २ हजार २१५ रुपये आहे. म्हस्के हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत.
म्हस्के यांच्या संपत्तीचा तपशील
रोख रक्कम - ५ लाख
पत्नीकडे - ३ लाख
जंगम - ६.१८ कोटी
पत्नीकडे - ४ कोटी ७ लाख ५४ हजार १०५
स्थावर - १२.०३ कोटी
पत्नीकडे - ३ कोटी ९६ लाख ४० हजार ३८३
कर्ज - ३ कोटी ६२ लाख २९,२३९
पत्नीकडे - ९८ लाख ३४,६५१
वारसा हक्काने - १ लाखाची
दाखल गुन्हे - ०७
वाहने - टोयोटा इनोव्हा, हुंडाई क्रियेटा, फॉर्च्युनर.
शेती - महाडमध्ये तळीये गावात जमीन.
सदनिका - ठाण्यातील पालोमा सिएचेसमध्ये घर, साईतीर्थ सिद्धार्थनगर, पार्वती निवास अनुस्मृती, रो हाऊस, पत्नी नावे : दोस्ती वसंतामध्ये घर
शिक्षण - १२ वी.