लोकसभा पे चर्चा... भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांची ठाण्यात रविवारी बैठक
By अजित मांडके | Published: February 23, 2024 02:50 PM2024-02-23T14:50:21+5:302024-02-23T14:51:02+5:30
ठाणे व पालघरमधील चार लोकसभा मतदारसंघांवर चर्चा
ठाणे : भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडून ठाण्यात रविवारी (ता. २५) प्रमुख नेते, पदाधिकारी आणि बुध अध्यक्षांची महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे रविवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा कोअर कमिटी, विधानसभा कोअर कमिटी, आणि लोकसभा-विधानसभा इलेक्शन मॅनेजमेंट समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्याबरोबरच पक्षाच्या आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बूथ अध्यक्षांचाही बैठकीत समावेश असेल. या वेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपाचे क्लस्टर प्रमुख व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचीही उपस्थिती असेल. या बैठकीत ठाणे व पालघर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.