ठाणे जिल्ह्यातील लोकसभा - विधानसभा मतदानासाठी ३५८०० ईव्हीएम मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:57 PM2018-11-03T17:57:47+5:302018-11-03T18:06:19+5:30

या सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत भेल कंपनीच्या इंजिनीअरमार्फत महसूल अधिकारी, कर्मचा-यांसमवेत १७ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फत एक टक्का मशीनमध्ये एक हजार २००, दोन टक्के मशीनमध्ये एक हजार व दोन टक्के मशीनमध्ये ५०० सराव मतदान करण्याची कार्यवाही

Lok Sabha in Thane district - 35800 EVM machines for assembly polling | ठाणे जिल्ह्यातील लोकसभा - विधानसभा मतदानासाठी ३५८०० ईव्हीएम मशीन्स

१२ हजार ६५९ बीयू, सात हजार ३६१ सीयू व सात हजार ३६१ व्हीव्हीपीएटी एवढ्या ३५ हजार ८०० मशीन प्राप्त

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा - विधानसभा मतदानासाठी ३५८०० ईव्हीएम मशीन्सप्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्येमतदारांना त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची खात्री त्या मतदाराला तत्काळ होणार

ठाणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यास भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीच्या १२ हजार ६५९ बीयू, सात हजार ३६१ सीयू व सात हजार ३६१ व्हीव्हीपीएटी एवढ्या ३५ हजार ८०० मशीन प्राप्त झालेल्या आहेत. त्या अन्नधान्य गोदाम कोपरी, ठाणे (पूर्व) येथे सुरक्षित ठेवलेल्या आहेत.
या सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत भेल कंपनीच्या इंजिनीअरमार्फत महसूल अधिकारी, कर्मचा-यांसमवेत १७ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फत एक टक्का मशीनमध्ये एक हजार २००, दोन टक्के मशीनमध्ये एक हजार व दोन टक्के मशीनमध्ये ५०० सराव मतदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. २०१९ ला होणाºया लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर नव्याने प्राप्त झालेल्या व तपासणी केलेल्या बीयू, सीयू, व्हीव्हीपीएटीद्वारे मतदान होणार आहे.
नागरिकांनी केलेल्या मतदानाबाबत साशंकता निर्माण होत असल्याने ईव्हीएम मशीनबाबत समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणूक आयोगाने यावर तोडगा काढून नवीन ईव्हीएम मशीनसोबतच व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारास त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची तत्काळ खात्री करता येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ईव्हीएम मशीनबाबत समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच त्यांनी सध्याच्या घडीला ईव्हीएम मशीनबाबत राजकीय पक्षांसह मतदारांमध्ये संभ्रम आहे.
हा संभ्रम दूर व्हावा, तसेच त्यांनी केलेल्या मतदानाची माहिती त्यांना मिळावी, यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीनसोबतच व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्यात येणार आहे. यामुळे मतदारांना त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची खात्री त्या मतदाराला तत्काळ होणार आहे. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.

Web Title: Lok Sabha in Thane district - 35800 EVM machines for assembly polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.