‘लोकमत’च्या छायाचित्रकारास मारहाण , दोघांना अटक : आगीचे छायाचित्रण करताना रक्षकांची मुजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:37 AM2017-10-09T01:37:27+5:302017-10-09T01:37:40+5:30
महागड्या मोटारींच्या ठाण्यातील एका शोरूमच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीची छायाचित्रे काढण्यास गेलेल्या तीन छायाचित्रकारांना तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
ठाणे : महागड्या मोटारींच्या ठाण्यातील एका शोरूमच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीची छायाचित्रे काढण्यास गेलेल्या तीन छायाचित्रकारांना तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. यामध्ये ‘लोकमत’चे छायाचित्रकार रोशन घाडगे यांचाही समावेश आहे. या मारहाणप्रकरणी दोन कर्मचाºयांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या आगीत जुन्या आणि नव्या अशा १५ गाड्या जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शुक्र वारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका गाड्यांच्या शोरूमला आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची छायाचित्रे घेण्याकरिता छायाचित्रकार व वार्तांकनाकरिता गेलेले कॅमेरामन यांना वृत्तसंकलन करण्यास कंपनी व्यवस्थापनामार्फत मज्जाव करण्यात आला.
शनिवारी सकाळीही पत्रकार व छायाचित्रकार घटनास्थळी पोहोचले असता कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मज्जाव केला. या वेळी सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकांना शिवीगाळ केली तसेच ‘लोकमत’चे छायाचित्रकार रोशन घाडगे तसेच गणेश कुरकुंडे, स्वप्नील शेजवळ यांना धक्काबुक्की व मारहाण केली. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाºयाविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ निलेश तानाजी कदम व योगेश मच्छिंद्र सवणे या दोन सुरक्षारक्षकांना अटक केली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला.