कर्तृत्ववान महिलांसाठी लोकमत ‘सखी सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:14 AM2017-12-10T06:14:13+5:302017-12-10T06:14:22+5:30
एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्र ांत करणाºया महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’चे आयोजन केले जाते. यंदा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बुधवार, १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘सखी सन्मान सोहळ््या’चे आयोजन करण्यात आले असून, तेरणा हॉस्पिटल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे.
महिला सक्षमीकरणात सदैव अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे मुंबई शहरातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरिता त्यांचा ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शौर्य, क्र ीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या सर्वच वाचकांसाठी आणि ‘सखी मंच’च्या सर्व सभासदांसाठी खुला असून, वाचकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन ‘लोक मत’ सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ््यादरम्यान सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेरणा हॉस्पिटल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत २००हून अधिक डॉक्टर्स या ठिकाणी रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे सहप्रायोजक शीतल किड्स आणि शीतल अॅकॅडमी आहे. अचूक इंग्रजी बोलण्यास शिकविणाºया शीतल अॅकॅडमीच्या भारतात १८० आणि नेपाळमध्ये पाच संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाºयांच्या मदतीने चेंबूरमध्ये शीतल किड्स हे लहान मुलांची प्लेस्कूल, तसेच नर्सरी
सुरू करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे
खास आकर्षण
‘नटरंग’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली यांच्याशी दिलखुलास गप्पा
सुप्रसिद्ध गायक चिंतामणी सोहणी यांची सांगीतिक मैफील
स्पार्क्स डान्स अॅकॅडमीचा नृत्याविष्कार
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक
तेरणा हॉस्पिटल
सहप्रायोजक :
शीतल किड्स आणि शीतल अॅकॅडमी
मोराज डेव्हलपर्स (बिल्डर्स)
पीतांबरी रुचियाना गूळ, रवी मसाले.
व्हेन्यू पार्टनर - नवी मुंबई महानगरपालिका
आउटडोअर पार्टनर -
रोनक अॅडव्हटायझिंग
विक्रांत अॅडव्हटायझिंग