जागतिक सायकल दिनानिमित्त डोंबिवली सायकल क्लबची लोनाड लेणी सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 05:45 PM2018-06-03T17:45:04+5:302018-06-03T17:45:04+5:30

जागतिक सायकल दिवस जवळ येत होता, तशी मुंबईत हा दिवस साजरा करण्याची तयारी होऊ लागली.

Lonad Caves Safari of Dombivli Cycle Club on the occasion of World Cycle Day | जागतिक सायकल दिनानिमित्त डोंबिवली सायकल क्लबची लोनाड लेणी सफारी

जागतिक सायकल दिनानिमित्त डोंबिवली सायकल क्लबची लोनाड लेणी सफारी

Next

डोंबिवली: जागतिक सायकल दिवस जवळ येत होता, तशी मुंबईत हा दिवस साजरा करण्याची तयारी होऊ लागली.
तशीच तयारी डोंबिवली सायकल क्लबने देखिल सुरु केली, पण अवघे चार दिवस आधी. आणि अखेरीस रविवारी सकाळी लोनाडच्या ऐतिहासिक लेण्यांपर्यंत डोंबिवलीतील ५५ सायकलपटूंचा चमूने तेथे हजेरी लावली.
गृपचे शशांक वैद्य यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, जागतिक सायकल दिन हा दिवस कसा साजरा करणार याबद्दल क्लबमध्ये काहीही हालचाल दिसत नव्हती. पण तरीही चार दिवस राहिले असताना मात्र हालचाल सूरु झाली. ममता परदेशी, गन्धार , रुधिर मोघे आणि शशांक वैद्य यांनी प्राथमिक बोलणी केली आणि ३ जून रविवारी राइड करायचे ठरले. ठिकाणही ठरले लोनाडपर्यंत जायचे. ऐतिहासीक लेणी बघायची येतांना न्याहारी करायची आणि उन्ह व्हायच्या आत परतायचे.
त्यासाठी मिटिंग देखिल झाली, आणि शुक्रवार रात्रीपासून डीसीसी च्या व्हाट्सअ‍ॅप गृपवर कोणकोण येणार याचे आवाहन केले गेले. त्यानूसार शनिवार रात्री उशिरापर्यंत ५५ सदस्य जाणार असल्याचे नक्की झाले. नियोजनानूसार सकाळी ६.१५ ला शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरपाशी डीसीसीचे सदस्य जमू लागले. काहीजण ९० फुटी रस्त्यापाशी आले. तिथे मोजणी झाली तेव्हा ५५ सदस्य होते. स्वसंरक्षणासाठी 'नो हेल्मेट नो राइड' असा राइडचा संकल्प आधी दिला होताच, त्यामुळे नाईलाजाने ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते अश्या ३-४ जणांना परत पाठवावे लागल्याची खंत कल्बच्या सदस्यांनी व्यक्त करत संकल्प केल्यानूसार तो पूर्ण झाल्याचे समाधान मिळाल्याचेही म्हंटले. डोंबिवली ते लोनाड सुमारे १७ किमीचे अंतर आहे. त्यासाठी साधारणपणे चमूतील सगळयांचा वेगाचा अंदाज घेत तासाभरात आम्ही लोनाडला पोहोचणा होतो असे ठरले होेते. त्यानूसार श्रीगणेश मंदिराच्या प्रवेशद्वारापासून काहींनी शुभारंभ करत बाकीच्यांनी ठाकुर्ली येथिल ९० फुटी रस्ता येथे जमा झाले. सकाळी ६.४५ नंतर सगळयांनी जाण्यासाठी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला आणि सायकली लोनाडच्या दिशेने निघाल्या. कल्याणच्या पत्री पूल, -दुर्गाडी किल्ला, आधारवाडी चौक मार्गे बापगाव सोनाळे रस्त्यापर्यंत नियोजनानूसार सायकलींग करण्यात आले. तेथून लोणाड गावात शिरताना एक जुना शिलालेख पहिला. पूढे १ल्या शतकात बांधलेले शिवमंदिर आहे ते पाहिले. मंदिर भग्नावस्थेत असून केवळ गाभारा शाबूत आहे. मात्र तेथे अजूनही रोज पूजा अर्चा होते. तेथून सकाळी ८.१५ च्या सुमारास लोणाड जवळील बौद्ध लेणी पाहायला गेलो. लेणी ५ व्या शतकातील असून तेथे जातक कथांवर आधारित चित्रे आहेत. लेण्यांचा परिसर सुंदर आहे. सभामंडप शाबूत आहे मात्र बाहेरील खांब ढासळत असल्याचे नीदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. बौद्ध लेण्यांसमोर सेल्फी, फोटो सेशन करून परत निघाल्याचे मेघेश कुलकर्णी यांनी सांगितले. परत येताना लोणाड गावात परत न जाता सावड नाक्याकडे वळलो. सावड नाका येथे यथेच्छ न्याहारी केली. काहीजण थोडे पुढे गेले. आणि मागे कोणीही न राहील्याचा अंदाज घेत अन्य ८-१० जणांनीही सकाळी १० च्या सुमारास डोंबिवली गाठली. अशा पद्धतीने जागतिक सायकल दिन उत्साहात संपन्न झाल्याचे सांगण्यात आले. आणि डिसीसीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचेही समाधान मिळाले.
-------------
फोटो: ०३ डोंबिवली सायकल दिन
फोटो ओळ: जागतिक सायकल दिनानिमित्त डीसीसीच्या सदस्यांनी लोनाड लेण्यांपर्यंत सायकल सफारी केली

Web Title: Lonad Caves Safari of Dombivli Cycle Club on the occasion of World Cycle Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.