मुंबई - नाशिक महामार्गात पावसामुळं खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 03:29 PM2024-06-30T15:29:44+5:302024-06-30T15:30:26+5:30

महामार्गांवरील खड्डे व वाहतूक कोंडी पासून वाचण्यासाठी मुख्य सचिवांनी आज कसारा रेल्वे स्थानकावरून लोकलने जाणे पसंद केले.

Long queues of vehicles due to rain on Mumbai-Nashik highway chief secretary traveled by local | मुंबई - नाशिक महामार्गात पावसामुळं खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

मुंबई - नाशिक महामार्गात पावसामुळं खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

कसारा दि. 30 शाम धुमाळ

मुंबई - नाशिक महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे होऊन खड्ड्याचे साम्राज पसरले आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील आसनगाव  हद्दीत  संत गतीने चालू असलेले रेल्वे ब्रिजचे व वशिंद मध्येही  चालू असलेले उढाण पुलाचे काम त्यामुळे  मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील  चेरपोलीघाट, शहापूर, आसनगाव ते वशिंद पर्यंत लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात नियमित ची ही वाहतूक कोंडी मुळे मोठ्याप्रमाणात होत आहे. परिणामी या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहीका, स्कुलबस् यांना बसत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान या वाहतूक कोंडी चा फटका राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना देखील बसला असून महामार्गांवरील खड्डे व वाहतूक कोंडी पासून वाचण्यासाठी त्यांनी आज कसारा रेल्वे स्थानकावरून लोकल ने जाणे पसंद केले. आज नाशिकहून येत असताना त्यांनी आपला ताफा कसारा रेल्वे स्थानका कडे वळवून कसाराहून मुबई साठी दुपारी दीड च्या लोकल ने त्यांनी प्रवास सुरु केला.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणा हवेतच 
 मुंबई नाशिक महामार्गांवरील खड्डे आणि महामार्गाचे संतगतीने सुरू असलेल्यामूळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून २८ जुलै २०२३  रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र त्यांचे आदेश आजही कागदावरच असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आल्याने  खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून चालकांना त्याचा नाहक त्रास करावा लागत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच .असल्याची चर्चा वाहन चालक करताना दिसत आहे. .  

गेल्या ८ ते १० वर्षापासून मुंबई नासिक मार्गमार्गचे आठ पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संतगतीने सुरू असून नाशिक, ठाणे, मुंबई या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.  त्यातच नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध  दिशेने वाहने टाकल्याने दोन्ही लेन पूर्ण जाम होत आहे

 दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जुलै २०२३  संबंधित यंत्रणांना दिले होते. तसेच  मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या,  रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे याकडे लक्ष द्या, वाहतुकीचे नियमन करा तसेच  खड्डेमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स यापुर्वीच स्थापन करण्यात आला होता. 
 या टास्क फोर्सने नियमित बैठका घेऊन खड्डेमुक्तीच्या मोहिमेला गती द्यावी. वाहतुकीच्या नियंत्रण-नियमनाकडेही लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत देऊन  ते म्हणाले की, अवजड वाहने व माल वाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करा. हाईट बॅरियर लावण्यात यावीत. महामार्गांच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावीत. वाहतुक नियमनासाठी वॅार्डनसची नियुक्ती करण्यात यावी.अशा अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या परंतु मुख्यमंत्र्यांच्या या सुचने ला राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण ने केराची टोपली मुंबई-
 
 मुंबई- नाशिक महामार्गाच्या निकृष्ठ कामा मुळे  ठेकेदार,पोट ठेकेदार यांना मागील वर्षी 5 कोटी चा दंड प्रसासनाकडून करण्यात आला होता परंतु दंड वसूल न करता त्याचं ठेकेदारांना अभय देण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  करीत असल्याचा आरोप होत आहे..
 
एकीकडे पाऊस दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे पोलिसांचे हाल.
दरम्यान एकीकडे भरमसाठ टोल वसूल केला जातो परंतु या महामार्गांवर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे त्यामुळे 2 किमी पर्यत वाहणांच्या रांगा लागल्या जात आहेत ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.
 

Web Title: Long queues of vehicles due to rain on Mumbai-Nashik highway chief secretary traveled by local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.