शहरातील बँका बाहेर जेष्ठांसह इतरांच्या लांबच लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 03:47 PM2020-04-03T15:47:48+5:302020-04-03T15:53:31+5:30
महिन्याची एक तारीख उलटून गेली आणि आता पैसे काढण्यासाठी, पगार तपासण्यासाठी, पीएफचे पैसे काढण्यासाठी बँकाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र ठाण्यातील अनेक बँकाच्या ठिकाणी दिसून येत होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांचा समावेश अधिक असल्याचे चित्र दिसत होते.
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर एकीकडे सोशल डिस्टेसिंग राखण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच गर्दी करु नका, गरज असेलच घराबाहेर पडा अशा सुचनाही दिल्या जात आहे. मात्र पगाराची तारीख आली आणि बँकेत पेन्शन जमा झाले का नाही, या पाहणे शुक्रवारी शहराच्या अनेक महत्वांच्या बँकाच्या बाहेर खातेदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या चित्र दिसत होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांची संख्याही अधिक असल्याचे दिसत होते. अनेक जण दिड ते दोन तास उन्हा तान्हाची तमा न बाळगता रांगेत उभे असल्याचे दिसत होते. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंसींगचे पालन करतांना दिसत नव्हते.
महिन्याची एक तारीख आली की अनेकांचे पगार होत असतात, काहींना याच तारखेला बँकेत पेन्शन जमा होत होते. कोणाचे पीएफी पैसे काढण्यासाठी धडपड असते. परंतु सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा बंद आहेत. यातून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता बँका देखील सुरु आहेत. परंतु बँकामध्ये जाण्यासाठी मागील काही दिवस नागरीक दिसत नव्हते. आता मात्र १ तारीख जाताच अनेकांनी बँकाच्या बाहेर लांबच लांब लावल्याचे चित्र शुक्रवारी अनेक बँकाच्या ठिकाणी दिसत होते. कोणी पेन्शनचे पैसे काढण्यासाठी कोणी पगाराचे पैसे काढण्यासाठी, कोणी पीएफमधील पैसे काढण्यासाठी तर कोणी केवळ बँकेत धनादेश टाकण्यासाठी रांगेत उभा असल्याचे दिसत होते. एकीकडे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे सांगितले असतांनाही नागरीक काही ना काही कारण देत घराबाहेर पडतांना दिसत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ठाण्यात दिवसागणिक वाढत आहे, शुक्रवारी ही संख्या १४ वर गेली आहे, अशात नागरीकांनी आपली काळजी घेणे आवश्यक असतांनाही ते घराबाहेर पडतांना दिसत होते. बँकेच्या बाहेर तर अनेक नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळ पासून नागरीक विविध कामांसाठी बँकाच्या रांगेत उभे होते. यामध्ये ६० वर्षावरील नागरीकांचा अधिक समावेश होता. आम्ही आमची काळजी घेऊनच घराबाहेर पडल्याचे अनेक जेष्ठ नागरीक सांगत होते. परंतु याठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन कुठेही होतांना दिसत नव्हते. परंतु पैसे काढले तर घरातील अत्यावश्यक सामान तरी घेता येईल अशी बाभडी आशा ते व्यक्त करतांना दिसत होते.
आम्ही सोशल डिस्टेसींगचे पालन केले जात नाही. परंतु काम असल्यानेच बँकेच्या रांगते उभे आहोत, दिड तास झाला रांगेत उभा आहे. केवळ बँकते चेक डिपॉझीट करायचा होता.
(अमोद चाचड - नागरीक)
पीएफचे पैसे काढण्यासाठी मी रांगते उभा आहे, आम्ही सहकार्य करीत आहोत, बँकेने देखील सहकार्य करावे.
(एप. पी. गुंद्रे - जेष्ठ नागरीक)
पीएफमध्ये चेक जमा करण्यासाठी मी रांगेत उभा आहे. दोन वाजता बँक बंद होणार आहे, त्यामुळे किती वेळ जाईल याची कल्पना नाही.
(रविंद्र दांडेकर - जेष्ठ नागरीक)