लाँग वीकएण्डला ठाणेकरांचे मँगो पर्यटन

By Admin | Published: April 12, 2016 01:04 AM2016-04-12T01:04:00+5:302016-04-12T01:04:00+5:30

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपतासंपता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुरूवारपासून आलेल्या लाँग वीकएण्डला सर्वाधिक ठाणेकरांची पसंती आहे, कोकणात जाऊन आंबे खायला.

Long Weekend Thanekar's Mongo Tourism | लाँग वीकएण्डला ठाणेकरांचे मँगो पर्यटन

लाँग वीकएण्डला ठाणेकरांचे मँगो पर्यटन

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे
मुलांच्या वार्षिक परीक्षा संपतासंपता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुरूवारपासून आलेल्या लाँग वीकएण्डला सर्वाधिक ठाणेकरांची पसंती आहे, कोकणात जाऊन आंबे खायला. त्याचबरोबर तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेण्यास आणि उन्हाची तलखी सोसवत नसल्याने थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आल्हाददायी अनुभव घेण्यासही पसंती दिल्याचे टूर आॅपरेटर्स, सहलीच्या आयोजकांनी सांगितले.
१४ ते १९ एप्रिलदरम्यान ठाण्यातील बहुतांश कुटुंबे सुटीची मजा लुटणार आहेत. वाढलेला उकाडा पाहता ठाणेकरांनी स्वाभाविकपणे आपला मोर्चा वळवला आहे थंड हवेच्या ठिकाणी. त्यामुळे अनेक जण ही सहा दिवसांची सुटी कोकणातच घालवणार आहेत. कोकण पाठोपाठ तीर्थयात्रेला पसंती आहे.
बहुतांश शाळांच्या परीक्षा बुधवारपर्यंत संपत आहेत. त्याला जोडूनच पालकांनाही पालकांनाही मोठी सुटी आहे. त्यामुळे या लाँग वीकएण्डचा फायदा घेत ठाणेकरांचे नियोजन आहे. बहुतांश ठाणेकरांनी कोकणात जाण्यावर अधिक भर दिल्याचे टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बुकींगवरून दिसून आले. धार्मिक सहली-तीर्थयात्रांमध्ये अष्टविनायक, शिर्डी-शनिशिंगणापूर, अक्कलकोट-गाणगापूर -पंढरपूर- तुळजापूर, तिरूपतीसह अन्य स्थळांचाही समावेश आहे.
दुष्काळात कोकणाला पसंती
विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा मोजका पट्टा येथील पाण्याच्या भीषण टंचाईमुळे यंदा कोकणात सुटी घालविण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतल्याचे निरीक्षणही वेगवेगळ््या सहलींचे आयोजक व टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मालकांनी नोंदविले.

१४ ते १७ एप्रिलदरम्यान अष्टविनायकाच्या पॅकेजला आमच्याकडे सर्वाधिक पसंती आहे. यात कुटुंबांनी केलेल्या बुकिंगची संख्या अधिक आहे.
- विकास शेलार, ए टू झेड ट्रॅव्हल्स

या सहा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ठाणेकर महाराष्ट्रातील जवळपासच्या ठिकाणी आणि सापुताऱ्यासह गुजरातच्या मोजक्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु सर्वाधिक संख्या कोकणात जाणाऱ्यांची आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्वर, काश्मीर, सिमला-कुलू-मनाली, कुर्ज, केरळ या ठिकाणांना पसंती आहे. ही संख्या कोकणाच्या तुलनेत कमी आहे. कोकणाबरोबरच धार्मिक स्थळी जाण्याकडेही ठाणेकरांचा ओढा आहे.
- श्रीकांत दांडेकर, अमेय ट्रॅव्हल्स

या लाँग वीकएण्डमध्ये कोकणात जाण्यास ठाणेकरांनी प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ परदेशी सहलींत सिंगापूरलाही पसंती आहे.
- राजेश्वर मुळे, इनक्रेडिबल हॉलीडेज

Web Title: Long Weekend Thanekar's Mongo Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.