धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात  राज्यभरातील आदिवासींचा लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:20 PM2019-03-04T18:20:25+5:302019-03-04T21:46:39+5:30

सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करीत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगराना मुख्यमंत्र्यांनी ज्या अदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगराना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला

Longmarch of tribals across the state against the decision of Dhangar community concessions | धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात  राज्यभरातील आदिवासींचा लाँगमार्च

धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात  राज्यभरातील आदिवासींचा लाँगमार्च

Next
ठळक मुद्देसुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लॉगमार्च काढणारधनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वास घात केला असल्याचा आरोपधनगर समाजाच्या या सवलती त्वरीत रद्द करून घेण्यासाठी लॉगमार्च

ठाणे : धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वास घात केला असल्याचा आरोप करून या सवलती त्वरीत रद्द करण्याच्या मागण्यासाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लॉँगमार्च  काढणार आहे. बुधवारी ६ मार्चपासून हा लॉगमार्च सुरू होईल. सुमारे ९ मार्चपर्यंत मुंबईला हा लाँगमार्च पोहोचणार असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले.

आदिवासींच्य सवलती धनगर समाजास लागू केल्यामुळे आदिवासी समाजाचा विश्वासघात केल्याचे जाधव यांनी सांगितले. धनगर समाजाच्या या सवलती त्वरीत रद्द करून घेण्यासाठी या लॉँगमार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी नेते, विद्यार्थी, तसेच महिलावर्ग मोठ्यासंख्येने सहभागी होणार आहे. नाशिक येथील गोलक्लब मैदानाहून हा लॉगमार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची दोन दिवसांपासून ठिकठिकाणी सभा, बैठका घेऊन आज हा निर्णय घेऊन लॉगमार्च निश्चित केला आहे.

सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करीत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगराना मुख्यमंत्र्यांनी ज्या अदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगराना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. 

Web Title: Longmarch of tribals across the state against the decision of Dhangar community concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.