ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:40 AM2020-07-18T00:40:26+5:302020-07-18T00:40:44+5:30

यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Looting of farmers and shopkeepers in Shahapur taluka during the rainy season | ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

Next

- जनार्दन भेरे

भातसानगर : शहापूर तालुक्यात पाऊस पडत असल्याने भातलावणीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. पावसाच्या सुरुवातीला व लावणीनंतर भातपिकांसाठी शेतकऱ्यांना खतांची गरज असते. सरकारकडून बांधावर खतवाटप केले जाईल, असे सांगितलेले असताना प्रत्यक्षात ते उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना दुकानात खरेदीसाठी जावे लागते. २८० रु पयांची खताची एक बॅग घेण्यासाठी ३०० रु पये मोजावे लागत आहेत. शिवाय, कुणाचेही नियंत्रण नसल्याने या दुकानदारांची मनमानी सुरू असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
शेतकºयांनी किमतींबाबत विचारले तर त्याला पुढील दुकानात जा, असे सांगतात. आता खते, औषधे येतील की नाही सांगता येत नाही, किमतीही वाढतील, याची भीती दाखवून खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी दुकानदार सांगतील त्या किमतीला कीटकनाशके विकत घेत आहेत. यामुळे दुकानदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.
कृषी खाते केवळ सल्ले देण्यात मश्गूल आहे. रोग पडलाय हे खरेदी करा, अशी लागवड करा. केवळ बांधावरचे सल्ले दिले जातात. कोणत्याही खते व औषधांच्या दुकानात जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहिले जात नाही, जेणेकरून शेतकºयांना वस्तूंच्या किमती माहीत होऊन तेथे त्यांना मार्गदर्शन होऊन चार पैसे वाचतील. सरकारी दुकानांमध्येही शेतकºयांची लूट सुरूच आहे. खताच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी लागणारे भाडे आणि ती बॅग घरापर्यंत आणण्यासाठी लागणारा खर्च साडेतीनशे ते पावणेचारशेपर्यंत जातो. शिवाय, वेळेचाही अपव्यय होतो.

दरवर्षी खतांच्या किमती या वाढतच आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५० रु पये अधिक खर्च होत आहेत. शिवाय, कोरोनाच्या भीतीपोटी दुकानदारांची गेली अनेक वर्षे न संपलेली बोगस कंपन्यांची औषधेही या दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकली.
कारण, शेतकरी अडचणीत सापडल्याने खते, बियाणे, औषधे लवकर घेण्यास सांगतात. त्यामुळे किंमत, संपलेल्या मुदतीकडे शेतकºयांचे दुर्लक्ष केले होते.

अधिक द्यावी
लागत आहे मजुरी
तालुक्यात मजुरांची वानवा असली, तरी शेतकºयांना मजूर आणि या मजुरांना काम याची नितांत गरज आहे. कोरोनाची भीती असल्याने जो तो अधिकची मजुरी देऊन शेतीची कामे लवकर करण्याची घाई करीत आहेत.
मजूर कामाला येतात मात्र कुण्या एकाच शेतकºयाच्या शेतात त्याची लागवड झाली की, मग ते घरी राहणेच पसंत करीत असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, कार्यालयाचे कामकाज पाहणारे पंढरी पाटील यांनी सांगितले की, खताची प्रतिबॅग २६६ रुपयांना असून अधिक दराने खरेदी करू नये.

Web Title: Looting of farmers and shopkeepers in Shahapur taluka during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी