हरवलेली महत्त्वाची कागदपत्रे तब्बल साडेपाच वर्षांनी मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:12 AM2020-11-26T00:12:06+5:302020-11-26T00:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणकि प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणकि प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणेरेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी मिहलेचा शोध घेऊन तिला बुधवारी सुपूर्द केली. ही महिला मूळची मुंबईतील रिहवासी असून लग्नानंतर ती केरळची रिहवासी झाली आहे.
एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे 2015 मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली. त्यामध्ये रेजिमोल कुंजप्पन या मिहलेची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळले. पिशवीत काही दूरध्वनी क्र मांक दास यांना मिळाले. त्यापैकी एकही क्र मांक कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन दास यांनी कुंजप्पन यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. दरम्यान, कुंजप्पन यांचा क्र मांक मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून मुंबईत परत येऊ तेव्हा संपर्क करून ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु, साडेपाच वर्षांत त्यांचे मुंबईत येणेच झाले नाही. त्यातच, नोव्हेंबर 2020 मध्ये त्या काही कारणास्तव मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपल्या हरवलेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन ती त्यांच्याकडून परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले. तसेच हरवलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘‘जन्म दाखला, सिनिअर केजीपासून बी. कॉम या कागदपत्रांसह एटीएमकार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. ही कागदपत्रे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच कुंजप्पन यांच्याशी संपर्क साधला. आठ मिहन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खातरजमा करून ती त्यांना परत केली.’’
- लक्ष्मण दास, तत्कालीन उपप्रबंधक, ठाणे रेल्वेस्थानक