५ हजार ३११ घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:24 AM2024-02-13T07:24:07+5:302024-02-13T07:24:33+5:30
तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेली २२७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या लॉटरीला आता २४ फेब्रूवारीचा मुहूर्त मिळाला आहे. मात्र, वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घरांची लॉटरी काढली जाण्याची शक्यता असली तरी याबाबत ठोस माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.
कोकण मंडळाची लॉटरीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० घरांचा समावेश आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ घरे, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी ६७ घरे, तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेली २२७८ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
यापूर्वी...
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ घरांचा विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या गो लाईव्ह कार्यक्रमाचा प्रारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबरला करण्यात आला होता.