अग्निशमन दलाकडे कमी मनुष्यबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:21 AM2018-08-27T04:21:56+5:302018-08-27T04:22:24+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत सध्या पाच केंदे्र सुरू असून ते चालवण्यासाठी केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी, तर ४२ कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत. त्यातच अनेक कंत्राटी चालक कामावर हजर राहत नाही. पालिकेने १९९९ मध्ये स्वत:चे पहिले अग्निशमन केंद्र भार्इंदर पश्चिमेकडील ६० फूट मार्गावर सुरू केले. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख होती. राज्य सरकारने या दलासाठी केवळ ११ पदांनाच मंजुरी दिल्याने एक उपकेंद्र अधिकारी व २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
मागील १९ वर्षांत शहराची लोकसंख्या सुमारे ४०० पटीने वाढल्याने सिल्व्हर पार्क व उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळ नवीन केंद्रे सुरू केली. त्यावेळी या विभागात एकूण ४० अधिकारी व कर्मचाºयांना सामावून घेतले. हे कर्मचारी अपुरे ठरल्याने माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या दलासाठी ९२ कर्मचाºयांच्या पदांना मंजुरी मिळवली. यामुळे सध्या या विभागांतर्गत एकूण १०३ पदेच मंजूर असल्याने प्रशासनासह सत्ताधाºयांनी त्याच्या वाढीसाठी सरकारदरबारी अद्यापही ठोस पाठपुरावा केलेला नाही. २०१२ मध्ये पालिकेने भार्इंदर पश्चिमेला उड्डाणपुलाच्या बाजूला नवीन केंद्र काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. प्रशासनाने २०१० मध्ये सुमारे ६५ कर्मचाºयांची भरती केली. मात्र, त्यातील १७ कर्मचाºयांनी आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने त्यांना तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी बडतर्फ केले. दलात एकूण १०३ पदे तूर्त मंजूर असतानाही पाचही केंद्रांत केवळ ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारीच नियुक्त केले आहेत. नियमानुसार प्रत्येक केंद्रात किमान २५, तर प्रत्येक पाळीत किमान आठ ते नऊ कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे. मात्र, केंद्रानुसार प्रत्येक पाळीत तीनच कर्मचारी ठेवले आहेत.
पालिकेकडून अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण केले जात असले, तरी त्याच्या बळकटीकरणासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे अतिरिक्त पदांच्या मंजुरीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
- बालाजी खतगावकर, आयुक्त
भार्इंदर पालिका : पाच केंद्रांमध्ये केवळ ८३ अधिकारी कायम