रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

By सदानंद नाईक | Published: June 9, 2023 03:26 PM2023-06-09T15:26:58+5:302023-06-09T15:28:09+5:30

रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे.

Lure of jobs in railways, fraud of 69 lakh 87 thousand of youth; Given fake appointment and joining letter | रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या अक्षय लोहार या तरुणाला श्रद्धा उर्फ जान्हवी चौगुले व दिपक महाजन यांनी रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून ६९ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-१ शिवरोड परिसरात अक्षय भास्कर लोहार या तरुणाला नोकरोचे गरज असल्याने, श्रद्धा उर्फ जान्हवी दत्ताराम चौगुले व दिपक महाजन यांनी संगनमत करून रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. अक्षय कडून वेळोवेळी असे एकून ६९ लाख ८७ हजार २५० रुपये उखळले. तसेच रेल्वेच्या सही शिक्क्याचे बनावट अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचे, उघड झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. अक्षय याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर श्रद्धा उर्फ जान्हवी चौगुले व दीपक महाजन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अक्षय प्रमाणे इतर मुलांना असेच फसविले का? याबाबत पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत.
 

Web Title: Lure of jobs in railways, fraud of 69 lakh 87 thousand of youth; Given fake appointment and joining letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.