रखडलेली १७५ कोटींची देणी मिळवण्यासाठी मफतलालच्या कामगारांचा आता एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:14 PM2019-05-25T19:14:02+5:302019-05-25T19:19:29+5:30
मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही.
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा येथील मफतलाल कंपनी मागील ३० वर्षापासून बंद पडली आहेत. यातील साडे तीन हजार कामगारांची सुमारे १७५ कोटींची देणी अद्यापही त्यांना मिळालेली नाही.आशा बाळगून असलेल्या एक हजार ५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. देशोधडीला लागलेला हा कामगार आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहे. याची रणनिती २६ मे रोजीच्या कामगार मेळाव्यात ऐरोली येथे आखली जाणार आहे.
मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही. साडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित आहे. या रक्कमेसाठी कळवा येथे असलेली कंपनीची शेकडो एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. तीन वेळा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमिनीचे एकरी सरकारी मूल्य ५ कोटी असताना ते ५० कोटी सांगितले जात आहे. यामुळे या जमिनीचा लिलाव तिन्ही वेळा होऊ शकला नाही. हेतुपुरस्सर जास्त रक्कम सांगितल्या जात असल्यामुळे विकासक ही जमीन घेण्यास धजावत नसल्याची खंत मफतलाल कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश पारख यांनी लोकमतला सांगितले.
कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळवून देण्यासाठी आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी होणाऱ्या कामगार मिळाव्यात आंदोलनाची दिशा व रणनिती सर्वांच्या साक्षिने ठरवण्यात येत असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी कामगार नेते सुरेश म्हात्रे, कृष्णा भगत यांचेही नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. कंपनी बंद पडल्यापासून कामगार विखुरलेला आहे. पण आता त्यांना एकित्रत करून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून येत्या रविवार ऐरोली येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटली आहेत. तरी देखील या हक्काच्या देणीपासून या कंपनीतील सुमारे तीन हजार कामगार आजपर्यंत वंचित आहेत. हक्काची रक्कम आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असतानाचा काहींचा मृत्यूही झाला आहे. या मफतलाल कंपनीच्या शेकडो एकर भूखंडावर अनेकांचा डोळा असल्याने कंपनीच्या कामगारांमध्ये वारंवार फूट पाडून त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. पण आता हा लढ तीव्र करून कामगारांची देणी मिळेपर्यंत लढण्यात येणार आहे. नऊ वर्षानंतर प्रथमच हा कामगारांचा मेळावा घेऊन लढ्याची दिशा निश्चित करणार असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यास ५०० पेक्षा अधिक कामगारांची उपस्थिती असणार असल्याचे पारख यांनी सांगितले. हा मेळावा २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐरोली येथील कुर्ग असोसिएशन हॉल, सेक्टर ३, येथील ऐरोली बस डेपोजवळ पार पडणार आहे.