माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:15 AM2018-01-17T01:15:30+5:302018-01-17T01:22:35+5:30
महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या
पेण : महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या सुबक मूर्तींवर रंगकामासह, डोळ्यांची नाजूक आखणी काम करण्यात गणेशमूर्तिकार मग्न झाले आहेत. श्रींची मूर्ती अधिकाधिक देखणी आकर्षक होईल, याकडे प्रत्येक मूर्तिशाळेचा भर असून, त्यासाठी कुशल कारागीर मेहनत घेत आहेत. पेणमधील दीपक कला केंद्र यासाठी आघाडीवर आहे. माघी गणेशोत्सवासाठी तब्बल १२००हून अधिक गणेशमूर्तींची मागणी विविध मूर्तिशाळांमध्ये आहे.
वर्षाकाठी तीन वेळा गणरायांचे आगमन होते, भाद्रपद महिन्यातील मेगा गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीला गणरायांना निरोप दिल्यानंतर याच महिन्यात येणाºया संकष्टी चतुर्थीला साखरचौथ गणरायाचे आगमन होते. यानंतर गणरायाचे थेट आगमन माघी गणेश जयंतीनिमित्त होते. माघ महिन्यात सध्या माघी गणेशोत्सव साजरा होतो. मात्र, माघी गणेश जयंतीचा उत्सव आता बाप्पावरील भक्तिभाव व श्रद्धेपोटी सार्वजनिक उत्सव मंडपांत सेलिब्रेशनसाठी सज्ज होऊ लागलाय. बाप्पाचे आगमन होणार म्हटले की, बाप्पांच्या आगमनाची तयारी म्हणून हौशी युवा मंडळे, महिला मंडळे यांची लगबग वाढली आहे. श्रींच्या मूर्तीची मागणी मूर्तिकारांकडे हौसेने केली जात आहे. सार्वजनिक मंडळाच्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी गणेशमूर्तिकार नेहमी सज्ज असतात. पेण शहरातील ३५० मूर्तिशाळा व हमरापूर जोहे विभाग श्री गणेशमूर्तिकलेच्या नगरीतील ४०० ते ४५० मूर्तिशाळांमध्ये सध्या माघी गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. अधिकृत मूर्तिशाळांमध्ये प्रत्यक्ष भेटीअंती आतापर्यंत विविध मूर्तिशाळांमध्ये १२००हून अधिक श्रींच्या मूर्तींची नोंदणी करण्यात आली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून माघी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सार्वजनिक गणेशमंडळे, तसेच बाप्पांचे भक्तगण घरगुती म्हणूनही श्रीची मूर्ती मोठ्या श्रद्धेने आणून उत्सव करू लागलेत.
सध्या मूर्तिकारांकडे श्रींच्या मूर्तीचे रंगकाम, आखणी व इतर हिरे, स्टोन व कलाकुसरीसाठी चांगलाच वेळ मिळत असल्याने श्री गणेशाचा उत्सव भाद्रपदातला असो की माघी, पेणची श्रीची मूर्ती म्हणजे चैतन्याचे अनोखो प्रदर्शन असते.