तीन मृत कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:06 AM2017-10-12T02:06:13+5:302017-10-12T02:06:27+5:30
ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे.
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी हिरेचोरीच्या गुन्ह्यात न्यायबंदी केलेल्या जियांग चांगक्विंग या चिनी कैद्याचा समावेश आहे. या तिघांबाबत कुणाला काही साक्ष किंवा पुरावा द्यावयाचा असल्यास त्यांनी चौकशीस येण्याचे आवाहन केले आहे.
जियांग चांगक्विंग (४८) याच्यावर हिरेचोरीचा आरोप असून त्याच्यासह आणखी एकाला या गुन्ह्यात अटक केली. त्या गुन्ह्यात जियांग आणि त्याचा सहकारी ठाणे कारागृहात न्यायबंदी म्हणून असताना त्याला अचानकपणे चक्कर आल्याने बरॅकमधून उठताना त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला ठाणे सिव्हील रुग्णालयात २९ आॅगस्ट २०१७ रोजी दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान समोर आले. तर, सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली न्यायबंदी असलेल्या वसईतील आशीष अनुप बरनवाल (२२) याने २९ जुलैला पहाटे बराक क्र. ७ च्या आत शौचालयात गळफास लावून घेतला. तसेच तिसरा, न्यायबंदी शैलेश मधुकर जाधव (३४) मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला २६ आॅगस्टला सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.