ठाण्यात 1 लाख वृक्ष लागवडीचे महाअभियान

By admin | Published: July 5, 2017 07:10 PM2017-07-05T19:10:50+5:302017-07-05T19:10:50+5:30

आपला ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावात

Maha Abhiyan of 1 lakh trees plantation in Thane | ठाण्यात 1 लाख वृक्ष लागवडीचे महाअभियान

ठाण्यात 1 लाख वृक्ष लागवडीचे महाअभियान

Next

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 05 -   आपला ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावात १ लाखझाडे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडलेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या वारकऱ्यांमुळे यासंपूर्ण परिसराला वारकरी दिंडीचे स्वरूप लाभले होते. 
विधायक कार्याच्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली की काय चमत्कार घडू शकतो, याची प्रचीतीच बुधवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी १५ हजारहून अधिक जणांचा सहभाग असूनही कुठलाही गोंधळ न होता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या दोन तासांमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले.


गेल्या महिन्याभरापासूनच या ठिकाणी या महाअभियानाची नियोजनबद्ध तयारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यानेतृत्वाखाली सुरू होती. या महाअभियानाचे उत्कृष्ट नियोजन हा सर्व उपस्थित मान्यवरांच्या कौतुकाचा विषय होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर पडलेले प्लास्टिकचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्याबाटल्या आणि अन्य कचरा एनएसएस,एनसीसीचे विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनीसाफ करून परिसर स्वच्छ केला. 
याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती या महाअभियानाला लाभली.⁠⁠⁠⁠

Web Title: Maha Abhiyan of 1 lakh trees plantation in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.