महाडीबीटी पोर्टल योजना: अर्ज एक योजना अनेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:50 AM2020-12-19T00:50:59+5:302020-12-19T00:54:30+5:30
कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे शेती निगडीत विविध बाबींसाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली शेतकºयांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकºयांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
ज्या शेतकरी बांधवांनी महा डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत येणारे सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी म्हटले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्र मांक आधार कार्डशी संलग्न करणेही आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल अथवा, संगणकाद्वारे, सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करणाºया सर्व शेतकºयांना त्यांचा आधार कार्ड क्र मांक या संकेतस्थळावर प्रमाणित करावा लागणार आहे. पोर्टलवरील अर्जांची आॅनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे तसेच निवडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रि या आॅनलाईन होणार आहे. लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. त्यामुळे सर्व इच्छुक शेतकºयांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.