महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 10:54 PM2017-07-26T22:54:37+5:302017-07-26T22:54:45+5:30
कोपरीच्या साईनाथनगर भागातील एका 40 वर्षीय विधवा महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-या पवन उर्फ निलेश शिरसाठ (26) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
ठाणे, दि. 26 - कोपरीच्या साईनाथनगर भागातील एका 40 वर्षीय विधवा महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-या पवन उर्फ निलेश शिरसाठ (26) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
साईनाथनगरात राहणारा पवन हा एका मेडिकल दुकानात कामाला असून तो गेल्या दोन महिन्यांपासून या महिलेच्या मागावर होता. तिला दोन मुले असून पतीचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तो तिचा नेहमीच पाठलाग करीत होता. 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ती घरात एकटी असताना त्याने घरात शिरकाव शरीर संबंध ठेवण्याची मागणी करीत तिचा विनयभंग केला. तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने तिचा पाठलाग करुन तिला मारहाण केली. तिने याप्रकरणी कोपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर 25 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जगताप याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.