महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 09:35 AM2019-07-27T09:35:36+5:302019-07-27T10:32:33+5:30

मुसळधार पावसामुळे रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे.

Mahalaxmi Express held up between Badlapur and Wangani | महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी 

महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी 

googlenewsNext

ठाणे - मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरक्षित ठिकाणी उभी असून प्रवाशांनी ट्रेनमधून उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगाव जवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

 

 

Web Title: Mahalaxmi Express held up between Badlapur and Wangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.