ठाण्यात रंगणार ३ डिसेंबरला महामॅरेथॉन कर दे धमाल, धावपटूंचा प्रतिसाद; लवकरात लवकर सहभागी व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:01 PM2023-11-28T12:01:51+5:302023-11-28T12:03:15+5:30

Mahamarathon:

Mahamarathon Kar De Dhamaal to be held in Thane on December 3, response from runners; Join as soon as possible | ठाण्यात रंगणार ३ डिसेंबरला महामॅरेथॉन कर दे धमाल, धावपटूंचा प्रतिसाद; लवकरात लवकर सहभागी व्हा

ठाण्यात रंगणार ३ डिसेंबरला महामॅरेथॉन कर दे धमाल, धावपटूंचा प्रतिसाद; लवकरात लवकर सहभागी व्हा

ठाणे - महामुंबई येथील धावपटू आणि नागरिक नेहमीच लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आतुर असतात. आता यंदा लोकमत महामुंबई महामॅरेथॉनचा थरार ३ डिसेंबर रोजी ठाणे येथील रेमण्ड कंपनीच्या कंपाऊंडमध्ये रंगणार आहे. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अॅण्ड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झालेली ही महामॅरेथॉन नागरिक व धावपटूंसाठी एक मोठी पर्वणी आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंसाठी पुन्हा एकदा 'कर दे धमाल करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात 'लोकमत'ने यशाची अनेक शिखरे याआधीच पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, तंदुरुस्तीविषयी जागरुकता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा महामॅरेथॉनचे हे सातवे पर्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षीप्रमाणे यंदाही सहा ठिकाणी लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी धावपटूंना मिळत आहे. यंदा लोकमत महामॅरेथॉनचा श्रीगणेशा ३ डिसेंबर रोजी आपल्या महामुंबई मॅरेथॉनने होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे १७ डिसेंबर, नाशिक येथे ७ जानेवारी, कोल्हापूरला २८ जानेवारी, नागपूरला ४ फेब्रुवारी आणि पुणे येथे १८ फेब्रुवारी रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे. 

१२ लाखांपर्यंत रोख पारितोषिके
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि. मी. मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके, तसेच ३ आणि ५ कि.मी. मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि. मी., ५ कि. मी., १०कि. मी. आणि २१ कि. मी. अंतरात होणार आहे. 

३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक वर्षभरापासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क मॅरेथॉनला साजेल अशा अद्ययावत  तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची प्रतिक्रिया  सहभागी धावपटूंत नेहमीच असते.

ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार
3 डिसेंबर रोजी महामुंबई येथे होणाऱ्या लोकमत समूहाच्या महामॅरेथॉनमध्ये ५० च्या संख्येने ग्रुपने रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ग्रुपने रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्यांनी ९५९४२२२०२४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

विजेत्यांना रोख पारितोषिकांसोबत प्रायोजकांकडून आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत, तसेच सर्व धावपटूंमधून काही भाग्यवान विजेत्यांनादेखील आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू, नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून आपला ऑनलाइन सहभाग निश्चित करता येणार आहे.

Web Title: Mahamarathon Kar De Dhamaal to be held in Thane on December 3, response from runners; Join as soon as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.