उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त

By सदानंद नाईक | Published: October 31, 2024 07:11 PM2024-10-31T19:11:35+5:302024-10-31T19:12:24+5:30

सदर वाहन चालकाला भरारी पथकाने विचारना केली असता, त्यांनी कोणताही ठोस पुरवा दिला नाही.

Maharashtra Assembly Election 2024 - Action of Ulhasnagar Election Bharari Team; 17 lakh cash seized | उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त

उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त

उल्हासनगर : निवडणुक मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहिता भरारी पथकाने गुरुवारी पहाटे २ वाजता कल्याण-मुरबाड रस्त्यावर एका कारच्या तपासणीत १७ लाखाची रोख रक्कम जप्त केली. सदर रक्कमचा भरणा कोषगारात जमा केली असून अधिक तपास आयकर विभाग करीत आहेत. 

उल्हासनगर मतदारसंघाच्या निवडणूक भरारी पथकाने गुरुवारी पहाटे कल्याण-मुरबाड रस्त्यावरून जाणाऱ्या संशयास्पद एमएच०५, डीझेड-९९११ नंबरच्या वाहनाची तपासणी केली. वाहनात रोख रक्कम आढळून आली असून त्याची मोजणी केली असता १७ लाख रोख रक्कम होती. सदर वाहन चालकाला भरारी पथकाने विचारना केली असता, त्यांनी कोणताही ठोस पुरवा दिला नाही. त्यामुळे सदरची रोख रक्कम जप्त करुन ती कोषागारात भरणा करण्यात आली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. याबाबत आयकर विभागाला कळविले असून सदर विभागामार्फत या प्रकरणी तपासणी सुरु आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Action of Ulhasnagar Election Bharari Team; 17 lakh cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.