‘विधानसभेची मॅच महायुती जिंकणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:14 AM2024-10-29T08:14:06+5:302024-10-29T08:14:17+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतले. बंद पडलेली कामे आम्ही सुरू केली, असे शिंदे म्हणाले.
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : आम्ही चौकार, षटकार मारू, असे काही लोक म्हणत असतील, पण विधानसभा निवडणुकीची मॅच महायुतीच जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला. आम्हाला रेकॉर्डब्रेक विजय मिळेल. प्रत्येक घरातील माणूस रस्त्यावर उतरून या मिरवणुकीत सहभागी झाला. गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतले. बंद पडलेली कामे आम्ही सुरू केली, असे शिंदे म्हणाले.
कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज सहकुटुंब दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुलगा खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मॉडेला चेकनाक्यापासून मिरवणूक काढण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही काळ सहभागी झाले.
‘एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे’
शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे. लाडक्या बहिणींसाठी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. शिंदे पुन्हा उमेदवारी न घेता इतर कोणा शिवसैनिकाला उमेदवारी देणार होते. मात्र, आम्ही हट्ट धरल्याने शिंदे पुन्हा निवडणूक लढत आहेत, असे खा. म्हस्के म्हणाले. वारसा हा विचारांचा आणि सामाजिक कार्याचा असावा लागतो, असा टोला म्हस्के यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांना लगावला.
संपत्तीत पाच वर्षांत २६ कोटीची वाढ
शिक्षण - बी. ए.
संपत्ती २०२४ ३७,६८,५८,१५०
संपत्ती २०१९ ११,५६,७२,४६६